आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 कोटींची कार दुबई पोलिसांच्या ताफ्यात, अडीच सेकंदात घेते 100 किमीचा स्पीड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- दुबई पो‍लिसांच्या ताफ्यात 25 कोटी रुपये किंमतीची लक्झरी कार 'बुगाती वेरॉन'चा दाखल झाली आहे. दुबई पोलिस कमांडर-इन-चीफ मेजर जनरल खमीस मतर अल मजीना यांनी ही माहिती दिली. दुबईचे प्रिन्स शेख हमदन बिन राशी अल मख्तूम यांनी या कारला ग्रीन सिग्नल दाखवला. शहरात पेट्रोलिंग करताना पोलिसांना या कारची मोठी मदत होणार आहे.

अल मजीना म्हणाले, दुबई शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पर्यटन स्थळासह पर्यकटकांना सुरक्षा देण्यासाठी पोलिसांना आधुनिक गाडीची गरज होती. सरकारच्या निर्णयानंतर लक्झरी कार 'बुगाती वेरॉन'चा पोलिसांच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. या कारच्या माध्यमातून टूरिस्ट आणि ऐतिहासिक स्थळावर पेट्रोलिंग करण्यास सोपे जाणार आहे. 'खलीज टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बुर्ज खलीफा, दुबई मॉल, जुमेराह बीच रेसीडेंस, बुर्ज अल अरब, शेख मोहम्मद मार्ग आदी ठिकाणी पेट्रोलिंग केली जाणार आहे.

कार्यक्रमाला सौदी अरबचे गृह मंत्रालयातील पब्लिक सिक्युरिटी डॉयरेक्टर मेजर जनरल ओथमॅनबिन नसीर अल मेहर्ज, स्पेशल इमेरजेंसी फोर्सचे कमांडर मेजर जनरल खालिद बिन गहरर अल हर्बी, कम्युनिटी सर्व्हिसेस डिपार्टमेंटचे डायरेक्टर जनरल अब्दुल रहमान मोहम्मद रफी आणि ट्रान्सस्पोर्ट-रेस्क्यू ऑपरेशन डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर ब्रिगेडियर पायलट अनस अल मतरूशी उपस्थित होते.

दरम्यान, दुबई पोलिसांच्या ताफ्यात अनेक लक्झरी गाड्या आधीपासून आहेत. त्यात मॅक्लेरेन MP4-12C, एस्टन मार्टिन, बेंटले, लॅम्बॉर्गिनी, निस्सान, फॉक्सवेगन, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज यांचा समावेश आहे. यात आता बुगातीही सामिल झाली आहे. विशेष म्हणजे फरारीचे दोन मॉडेल दुबई पोलिस वापरत आहेत. या महागड्या गाड्या चालवण्यासाठी पोलिसांना खास ट्रेनिंगही दिली जात आहे.

काय खास आहे 'बुगाती वेरॉन'मध्ये, वाचा पुढील स्लाइड्‍सवर...