आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ब्राउझिंग आणखी होईल सोपे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कम्प्युटिंगच्या काळात नेहमी वेब ब्राउझिंगच्यावेळी काही ना काही अडचणी येतात. उदाहरणार्थ यूआरएल बार गायब होतो, तर बुकमार्क सिंक करण्यास अडचणी येतात. याशिवाय वारंवार कमांड देण्यासाठी माऊस क्लिक करावे लागते; परंतु काही प्रोग्राम आणि अँप्लिकेशनच्या मदतीने ब्राउझिंगला सुखद अनुभवात बदलता येऊ शकते. यांच्या मदतीने वेळेची बचत होते, कशी ते जाणून घेऊया..
सिंक बुकमार्क : ज्या वेबसाइट्स आपण जवळपास रोजच पाहतो त्या बुकमार्कमध्ये सेव्ह होतात. अशाप्रकारे दररोज त्या साइटचा यूआरएल आयडी टाइप करण्याची गरज राहत नाही. मात्र, वेगवेगळ्या ब्राउझरवर वेगळ्याने बुकमार्क क्रिएट कराव्या लागतात. अशावेळी एक्समार्क्‍स सॉफ्टवेअर विविध ब्राउझर्सवर बुकमार्क सिंक करण्याची सुविधा देतो. उदाहरणार्थ तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, क्रोम आणि सफारी यासारख्या ब्राउझर्सवर बुकमार्क सिंक करू शकता. त्यासाठी एक्समार्क्‍स डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. एक्समार्क्‍स क्लाउडमध्ये सर्वच बुकमार्क्‍स सेव्ह होतात.
विना अकाउंट उघडा साइट्स : एखाद्या साइटवर रजिस्ट्रेशन करून घेणे म्हणजे डोकेदुखी असल्यासारखे वाटते. मात्र, कोणतेही रजिस्ट्रेशन न करता विविध वेबसाइट्स उघडण्याची सुविधा बगमिनॉट (BugMiNot) देतो. त्यासाठी या साइटवर जाऊन आवडत्या साइटचे नाव टाकावे, असे करताच आधीपासूनच नोंद असलेल्या युजर नेम आणि पासवर्डचा पर्याय बगमिनॉट सुचवतो. तुम्ही एकाची निवड करत संबंधित वेबसाइटवर विना रजिस्ट्रेशन सर्च करू शकता.
मोलाचे शॉर्टकट
की-बोर्डशी संबंधित काही सोपे शॉर्टकट ब्राउझिंगला आणखी सोपे करतात. जाणून घेऊया त्यांच्याबाबतीत..
> Ctrl T : नवीन टॅब उघडेल.
> Ctrl N : नवीन विंडो उघडेल.
> Ctrl W : उघडलेली टॅब बंद होईल.
> Ctrl L : यूआरएल हायलाइट होईल.
> Ctrl + : झुम-इन होईल.
> Ctrl - : झुम-आऊट होईल.
> Ctrl 0: डिफॉल्ट झुम लेव्हलवर परत यावे.
की-बोर्डशिवाय माऊसच्या माध्यमातूनही ब्राउझरला कमांड दिली जाऊ शकते. त्यासाठी mouse gesture add-on डाऊनलोड करावे लागेल.