आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍पेनमध्‍ये भीषण रेल्‍वे अपघात, बुलेट ट्रेन उलटली; 80 जणांचा मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सँटियागो दी कम्पोस्तला (स्पेन ) - वार्‍याच्या वेगाने सुसाट निघालेली रेल्वे बुधवारी रात्री सँटियागो स्थानकानजीक घसरुन उलटली. गाडीचा वेग एवढा प्रचंड होता की, वळणावर पूलास डबे घासत गेले व रेल्वे घसरताच गाडीचे सर्व डबे हवेत उडाले. हवेत गिरकी घेत एकमेकांवर पडले. या भीषण अपघातात 80 प्रवासी जागीच ठार झाले, तर 158 जण जखमी झाले आहेत. स्पेनमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. गत 70 वर्षांतील हा पहिलाच भीषण रेल्वे अपघात आहे.

238 प्रवासी या गाडीत होते. माद्रिदहून निघालेली ही गाडी फे रोलच्या दिशेने सुसाट वेगात निघाली असताना सँटियागो स्थानकानजीक बुधवारी रात्री 8.42 (भारतीय वेळ मध्यरात्री 12.12 वाजता) वळणावर घसरली.

1944 मध्ये माद्रिद-गॅलिसिया रेल्वेमार्गावर झालेल्या भीषण अपघातात शंभरावर लोक ठार झाले होते, तर सन 1972 मध्ये अँदालुसिया येथे झालेल्या रेल्वे अपघातात 77 प्रवासी बळी पडले होते.