आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
अवकाशाचा अभ्यास करणा -या शास्त्रज्ञांना पृथ्वीपासून सर्वात जवळच्या ओरियन तारामंडळात खास रुची असते. अनेक रहस्ये पोटात दडवलेल्या या तारामंडळाची तारा बनण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या तारामंडळाच्या केंद्रातून बुलेट्स निघतात. या बुलेट्सचा आकार आपल्या सौरमालेच्या आकाराएवढा मोठा आहे. फोटोमध्ये हे बुलेट्स निळ्या रंगाने दाखवले आहेत. हा फोटो चिली येथील जेमिनी साउथ टेलिस्कोपमधून घेण्यात आला आहे. इन्फ्रारेड स्पेक्ट्रमपासून घेण्यात आलेला हा क्लोज अप फोटो आहे. हायड्रोजनच्या ढगातील या वस्तू ध्वनीपेक्षाही जास्त वेगाने येतात, पण असे का होते, याचे उत्तर कुणाकडेही नाही. या बुलेट्स जवळपास 1000 वर्षांपूर्वी या तारामंडळातील आयआरसी 2 नावाच्या ढगांमधील एखाद्या रहस्यमय वस्तूपासून बनल्या असण्याची शक्यता आहे. नासाच्या मते, मोठ्या शक्तिशाली ता -या च्या निर्मितीवेळी अपेक्षेपेक्षा मोठे, प्लूटोच्या कक्षेपेक्षा 10 पटीने मोठे, गरम वायूने भरलेले ढग फोटोमध्ये निळ्या रंगांचे दिसत आहेत. तारा मंडळातील शॉक-हिटेड हायड्रोजन गॅसवरून हे बुलेट्स गेले असता त्यातील आयन चार्ज होतात आणि पिवळ्या रंगाच्या शेपटीसारखा भाग तयार होतो. या शंक्वाकाराची लांबी एक प्रकाशवर्षाच्या पाचव्या भागासमान आहे.
io9.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.