आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bunga Bunga Fame Burlsconki Return In Politices, Italy

बुंगा बुंगा बलरुस्कोनींचे पुनरागमन?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- इटलीचे वादग्रस्त माजी पंतप्रधान सिल्व्हियो बलरुस्कोनी यांचे राजकीय पटलावर पुनरागमन होण्याची शक्यता आहे. बलरुस्कोनी हे आगामी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बलरुस्कोनी यांनी राजीनामा देऊन पद सोडले होते. त्याच्या आठ महिन्यानंतर 75 वर्षीय बलरुस्कोनी यांच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी व एकेकाळचे मित्र गिआनफ्रान्को फिनी यांनी मात्र त्यांच्या पुनरागमनाची शक्यता फेटाळली. एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, इटलीच्या नागरिकांना कोणत्याही चमत्काराची अपेक्षा नाही.
दुसरीकडे फ्रीडम पीपल्स पार्टीचे नेते व माजी न्यायमंत्री अँजेलिनो अल्फानो यांनी पंतप्रधान पदाचे बलरुस्कोनी हे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले. बलरुस्कोनी यांनी सक्रिय राजकारणातील प्रवेशाबद्दल काहीही स्पष्टीकरण दिले नाही, परंतु पंतप्रधान पदासाठी आपल्या उमेदवारीची घोषणा बलरुस्कोनी यांच्याकडून करण्यात यावी, अशी आशा त्यांच्या सर्मथकांना वाटते. त्यांच्या सर्मथकांत त्याची उत्सुकता दिसून येत आहे. बलरुस्कोनी यांनी पंतप्रधान पदासाठी अनुकूलता दर्शवली आहे, अशी माहिती अल्फानो यांनी दिली. अस्फानो हे फ्रिडम पिपल पार्टीचे सचिव आहेत. गेल्या वर्षी बलरुस्कोनी यांनी नोव्हेंबरमध्ये निवासस्थान सोडले होते. बलरुस्कोनी यांनी देशाचे पंतप्रधानपद तीन वेळा सांभाळले आहे.
उद्योगपतींची योजना : बलरुस्कोनी यांच्या पुनरागमनास ते स्वत: किती उत्सुक आहेत. हे स्पष्ट होत नसले तरी त्यांना राजकारणाच्या आखाड्यात पाठवण्यासाठी देशातील काही अब्जाधीश उद्योगपती उतावीळ आहेत. त्यांचीच ही योजना आहे. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत त्यांना उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
का सोडावे लागले पद- बुंगा बुंगा पाटर्य़ा, भ्रष्टाचार व आर्थिक मंदी हे बलरुस्कोनी यांच्या पतनास या तीन गोष्टी कारणीभूत ठरल्या. बलरुस्कोनी यांच्या घरी बुंगा-बुंगा पाटर्य़ा होत. त्यांच्या निवासस्थानी या पाटर्य़ा होत असत. त्यामुळे बलरुस्कोनी चांगलेच अडचणीत सापडले होते. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले. अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.