काठमांडू- नेपाळमध्ये झालेल्या बस दुघर्टनेत चार भारतीय नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. काठमांडूपासून जवळच असलेल्या 70 कि.मी. अंतरावरील धादिंग जिल्ह्यात एक बस नदीच्या पुलावरुन खाली पडली. शुक्रवारी सकाळी त्रिशुली नदीत ही बस कोसळली. या बसमध्ये किमान 40 जण प्रवास करीत होते. त्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन्हीही मृत महिलांची ओळख पटली असून, मुखिया ठाकूर व ऊर्मिला देवी सिंग अशी त्यांची नावे आहेत. त्या बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील आहेत. तिस-याची ओळख पटली नाही.