आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus And Truck Accident In Pakistan, 56 Passengers Died

पाकिस्तानात बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, 56 प्रवाशांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- दक्षिणी पाकिस्तानात बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 56 प्रवाशांचा मृत्यु झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. 10 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त बस स्वात खोर्‍यातून कराचीला जात होती. सिंध प्रांतातील खैरपूर शहराजवळ मंगळवारी सकाळी ही दुर्घटना झाली.
खैरपूर जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गुलाम जफ्फार सुमरो यांनी 'जियो टीव्ही'शी बोलताना सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, दुर्घटना सकाळी झाली. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुके होते. त्यात बसचा वेग जास्त असल्याने ती समोरुन येणार्‍या ट्रकवर आदळली. बसमध्ये 75 प्रवासी होते.