आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान : सुप्रीम कोर्टाच्या बाहेर घोषणाबाजी, 'गद्दार है आप गद्दार है'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतून बाहेर पडताच कोर्टातील व कोर्टाबाहोरील वकिलांनी त्यांच्या विरोधात नारेबाजी घोषणाबाजी केली. वकीलांनी त्यांना त्यांच्यासमोरच गद्दार म्हटले. त्याचवेळी वकीलाच्या आणखी एका गटाने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. जेव्हा गिलानी यांचे वकील एतजाज यांना याबाबत विचारले असता ते त्यांनी प्रश्नाला बगल देत ते माझे मित्र आहेत, असे उत्तर दिले.
गिलानी यांना सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्याची मुदत दिली आहे. तरीही न्यायालयाचा रोख कडकच राहिला. गिलानी यांनी आपला युक्तीवाद ४ क्रमांकावर केला. त्यानंतर गिलानी यांच्या वकीलाने न्यायालयाला उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा अवधी मागितला. त्यावर कोर्टाने कोटी करताना म्हटले की, सर्व रेकॉर्ड मिळवायला एक दिवसही पुरेसा आहे. मग न्यायालयाने त्यांच्या मागणीचा विचार करीत १५ दिवसाची मुदत दिली.
आता या प्रकरणाची सुनावणी 3 फेब्रुवारीला होणार आहे.
कोर्टाने याबाबत सांगितले की, गिलानी यांनी पुढच्या वेळी हजर राहण्याची गरज नाही. मात्र पंतप्रधान यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा विचार होऊ शकतो. त्याआधी गिलानी यांनी सुप्रीम कोर्टाच्या ७ न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे बोलताना सांगितले की, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना खटल्यातून वगळण्याची सूट घटनेने दिली आहे. त्यामुळे पंतप्रधानाला त्यासाठी जबाबदार ठरवता येत नाही. जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांना हे अधिकार मिळाले आहेत. त्यावर खंडपीठाने न्यायाधिशांना हे सांगितले तर ठीक आहे, पण जर राष्ट्राध्यक्षांना दिलेली सूट नाकारली तर आपण स्वीस अधिकारयांना झरदारी यांच्या भ्रष्टाचाराबाबत पत्र लिहणार का, असा प्रश्न केला.
गिलानी यांनी अवमान नोटिशीबाबत बोलताना सांगितले की, पीपीपीने न्यायपालिकेचा कायमच सन्मान केला आहे. मी अवमान करण्याचा विचारही करु शकत नाही. मी व्यक्तीगत पातळीवर न्यायालयाचा आदर करतो. गिलानीच्या या वाक्यानंतर कोर्टाने सांगितले की, पाकिस्तानसाठी हा दिवस खास आहे. पंतप्रधानांनी न्यायालयात येऊन इतिहास बनविला आहे तसेच न्यायपालिकेचा सन्मान वाढविला आहे.
या आधीचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी रिलेटेड आर्टीकल पहा
पंतप्रधान गिलानी सुप्रीम कोर्टात हजर, पक्षातील 45 नेत्यांची उपस्थिती
पाकिस्तान : गिलानी देणार राजीनामा, सय्यद खुर्शीद नवे पंतप्रधान?
होय, आम्ही चुकलो! पाकचे पंतप्रधान गिलानींची कबुली