आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • California Assembly Recognises India's Independence Day ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅलिफोर्नियामध्ये ‘भारतमाता की जय’; प्रथमच स्वातंत्र्यदिन साजरा करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - 15 ऑगस्ट दिनी भारतासोबतच कॅलिफोर्निया राज्यातही ‘भारत माता की जय’ चे नारे ऐकायला मिळणार आहेत. कारण भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या स्तरावर साजरा करण्याची परवानगी येथील सरकारने दिली आहे. तसाच ठराव प्रतिनिधी सभागृहात मंजूर झाला आहे.
बे भागातील लोकप्रिय प्रतिनिधी बॉब विकॉवस्की यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला सभागृहाने एकमुखाने मान्यता दिली. ठरावावर बोलताना सभागृहाचे अध्यक्ष जॉन पेरेझ म्हणाले, सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे जगातील स्थान अत्यंत महत्वाचे आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय राजदूत एन. पार्थसारथी यांच्याकडे सोपवण्यात आला. या ठरावाच्या निमित्ताने पार्थसारथी, फ्रीमाँटच्या उपामहापौर अनु नटराजन हे विशेष निमंत्रित होते.
भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव असलेल्या 15 ऑगस्ट दिनी पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. देशाने केलेली प्रगती व पुढील वाटचालीवर ते मत मांडतात, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. गुरुद्वार हल्ल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला काळी किनार लागली आहे.