आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाँट्रियल- तुरुंग फोडून कैद्यांनी पळून जाण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. परंतु कॅनडामधील घटना त्यावरील कडी म्हणावी लागेल. कारण कैद्यांनी येथील तुरुंगातून हेलिकॉप्टरने फिल्मीस्टाइल पलायन केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
माँट्रियलच्या वायव्येकडील सेंट जेरॉम तुरुंगातील ही रविवारची घटना. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालत होते. काही वेळानंतर त्यातून एक दोरखंड खाली सोडण्यात आला होता. त्या दोरीच्या साह्याने चढून दोन कैदी पसार झाले. फिल्मीस्टाइल पलायनाच्या प्रयत्नात दोन्ही आरोपी जखमी झाले. तेथून हेलिकॉप्टर काही किलोमीटर अंतरावर सोडून ते फरार झाले. कॅनडा पोलिसांनी तुरुंगापासून 85 किलोमीटर अंतरावर हेलिकॉप्टर जप्त केले. तासाभरानंतर हेलिकॉप्टर सापडले. घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहिमेला वेग दिला असून संपूर्ण भागाला घेराव घातला आहे. या भागात इतर कैदी दडून बसले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हेलिकॉप्टरच्या पायलटची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
कैदी अटकेत- पलायननाट्यानंतर पोलिसांनी कैद्यांची कसून शोधमोहीम राबवली. एका कैद्याला अटक करण्यात यश आले आहे. त्यात इतर दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेलिकॉप्टर कुठून आले? - कैद्यांनी एका ट्रॅव्हल कंपनीच्या हेलिकॉप्टरचे अपहरण केले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. पायलटच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याच्याकडून हे काम करून घेण्यात आले. त्या वेळी झालेल्या झटापटीत पायलट जखमी झाला. त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.