आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Canada Journalist Topless In Front Mayer In British Columbia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पत्रकार झाली टॉपलेस; महापौर भांबावून म्हणाले, हा काय प्रकार आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली गँगरेपनंतर मुंबईत झालेल्या वृत्तछायाचित्रकारावरील सामूहिक बलात्काराने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यानंतर राजकारणी मंडळींच्या वादग्रस्त वक्तव्यांनी त्यात आणखी भर घातली होती. नेत्यांनी कधी महिलांच्या कपड्यांवर टिप्पणी केली, तर कधी उशिरापर्यंत त्या घरी येत नसल्याचे म्हटले. भारतात महिलांवरील वाढत्या बलात्कारानंतर सुप्रिम कोर्टानेही देशाल काय झाले आहे... हे अत्याचार केव्हा थांबणार ? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे.

तर, दुसरीकडे अमेरिका आणि कॅनडामध्ये महिला टॉपलेस राहाण्याचा आम्हालाही हक्क असल्याचे म्हणत आहेत. 25 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर महिलांनी टॉपलेस होत पुरुषांप्रमाणे असे राहाण्याचा आम्हालाही अधिकार आहे, हे कृतीतून सिद्ध केले. पश्चिमेकडील महिलांना आता बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे प्रश्न सतावत नाही. तर, आता त्या शरीरावर एकही कपडा नसावा यासाठीची लढाई लढत आहेत.

आपल्या देशात महिला सर्वाधिक अंग झाकणारे आणि व्यवस्थित कपडे परिधान करतात. तरीही त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. कॅनडामध्ये कॅलॉव्हना शहराच्या महापौरांच्या मुलाखती दरम्यान एक प्रसंग असा घडला, की ते नुसते आ वासून पाहात राहिले. महापौरांच्या मुलाखतीदरम्यान रेडिओ जॉकी आणि स्तंभलेखिका टॉपलेस झाली आणि त्यानंतरही त्यांनी मुलाखत पुर्ण केली.

लॉरी वेलबॉर्न असे या रेडिओ जॉकीचे नाव असून त्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही करतात. ब्रिटीश कोलंबियाच्या कॅलॉव्हना शहराचे महापौर वॉल्टर ग्रे यांना लॉरी यांनी मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला होता, की शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांनी छाती उघडी ठेवली तर ते बेकायदेशीर आहे का? जर मी टॉपलेस होऊन शहरातील रस्त्यांवर फिरले तर काय होईल? विशेष म्हणजे त्यावेळी मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते.