आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅप्सूल कॅमेर्‍याने डॉक्टर शिरणार शरीराच्या अंतरंगात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- कॅप्सूलच्या आकाराचा कॅमेरा गिळून शरीराच्या आतल्या भागातील छायाचित्रे घेणे आणि रुग्णांच्या आजाराचे निदान करणे आता शक्य झाले आहे. रुग्णाने पिलकॅम कोलोन नावाचा हा कॅमेरा एकदा गिळला की तो आतड्यांतून शरीरभर फिरवता येतो आणि डॉक्टरांना हवा तिथे तो थांबवताही येतो. अमेरिकेत रोगनिदानासाठी हा कॅमेरा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. इस्रायली कंपनीने विकसित केलेला हुबेहूब कॅप्सूलसारखाच दिसणारा हा कॅमेरा वेदना आणि किरणोत्सर्गविरहित आहे. ज्या रुग्णांच्या मोठय़ा आतड्यांची संपूर्ण कोलोनोस्कोपी करणे अशक्य आहे, अशा रुग्णांसाठी हा कॅमेरा संजीवनी ठरणार आहे.

ऑप्टिकल कोलोनोस्कोपीपेक्षाही अचूक
हा कॅमेरा सहा मिलिमीटर व त्याहून मोठय़ा आकाराचे ग्रंथीबुर्द शोधून काढतो. या कॅमेर्‍याच्या 884 रुग्णांवर चाचण्या घेण्यात आल्या असून ऑप्टिकल कोलोनोस्कोपीपेक्षाही तो अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आठ तास शरीरात, पण इजा नाही