आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Car On I Pod Camera And Advanced 3 D Leaser Estimate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपॅडवर चालणारी कार - कॅमेरे आणि अत्याधुनिक थ्री-डी लेझरच्या साह्याने अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी ‘साय-फाय’ रोबोट कारचा शोध लावला असून ही कार आयपॅडच्या मदतीने चालकाशिवाय स्वत:च चालते.
ऑक्सफर्डचे हे संशोधन दररोजच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहन निर्मितीत मैलाचा दगड मानण्यात येत आहे. घाईगडबडीच्या वेळी किंवा शाळेच्या वेळात चालकाविना होणारी तारांबळ या कारमुळे टाळता येणार आहे. अत्यंत कमी खर्चाची ही कार छोटे कॅमेरे आणि अत्याधुनिक थ्री-डी लेझरच्या साह्याने अत्यंत चपखलपणे सभोवतालचा अंदाज घेते. तिच्या बूटमध्ये बसवण्यात आलेल्या संगणकाला माहिती पुरवते आणि चालते.
जीपीएस तंत्रावर विसंबून नसलेली ऑटो ड्राइव्ह कारची आम्ही निर्मिती करत आहोत. डिस्क्रीट सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित ही कार स्वस्तात पडते, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक पॉल न्यूमन यांनी सांगितले.
100 पाउंड्समध्ये कार
प्रोटोटाइप नेव्हिगेशन सिस्टिमच्या कारची किंमत 5,000 पाउंड्सपर्यंत जाते. 100 पाउंड्सच्या आसपास मिळणा-याकारची निर्मिती करण्याचे आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.
पॉल न्यूजमन, ऑक्सफर्ड विद्यापीठ