आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवलाई: काही हिर्‍यांचे अस्तित्व काही क्षणांपुरतेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन- सर्व प्रकारचे हिरे चिरकाल नसतात. कार्बनयुक्त पदार्थावर विद्युत किरणांचा प्रभाव पडतो तेव्हा त्यातून निर्माण होणार्‍या लहान आकारातील हिर्‍यांचे तेज मावळून जाते. त्यांचे आयुष्य केवळ काही सेकंदांचेच असते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

राइस विद्यापीठातील रसायनशास्त्राचे अभ्यासक एद बिलप्स आणि यानकी सन यांनी हा दावा केला आहे. प्रयोगशाळेत रासायनिक घटकांचे प्रमाण कमी असलेल्या कठीण अशा कोळशाचे रूपांतर द्रावणात करण्यात आले. कार्बनच्या विचित्र आकारातील ग्रॅफाइटमधील हायड्रोजनच्या विविध थरांना वितळवण्यात आल्याचा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी लहान आकारातील हिरे तयार झाले. कोळशावर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपजवळ कोळशाला आणताच ही क्रिया घडून येत असल्याचे प्रयोगात दिसून आले.

शक्तिशाली झोत
विशिष्ट कोळशावर शक्तिशाली स्वरूपातील झोत सोडण्यात आला होता. हायड्रोजन अणू त्यातून बाहेर पडू लागतात. हा झोत इलेक्ट्रॉनचा असतो. मायक्रोस्कोपजवळ कोळशाला आणल्यानंतर प्रचंड ऊर्जा निर्माण होते. त्यातून निघणारा हा झोत ऊर्जेतून सोडण्यात येतो.

अशी होते अभिक्रिया
ग्रॅफाइटमधील विविध थरांच्या पातळीवर अनेक रासायनिक अभिक्रिया होण्यास सुरुवात होते. त्यानंतर कोळशाचे रूपांतर अवघ्या काही वेळात छोट्या हिर्‍यामध्ये होते. हिर्‍याचा आकार सामान्यपणे 2 ते 10 नॅनोमीटर एवढा रुंद असतो.

इलेक्ट्रॉनच्या झोताने नष्ट
लहानातील लहान अशा आकारातील हिरे इलेक्ट्रॉनच्या झोतापुढे तग धरू शकत नसल्याचे प्रयोगात दिसून आले. हा प्रखर झोत अशा कणांवर पडताच ते काही सेकंदांत पूर्वस्थितीत जातात. ते स्थिर नसल्याचे दिसून आले आहे. कोळशातून तयार होणार्‍या लहान हिर्‍यांचे आयुष्य सुमारे 30 सेकंदांपर्यंतच दिसते. अर्थात ते हिर्‍यासारखे भासू लागतात. नंतर पुन्हा पूर्वस्थितीत पोहोचतात. अर्थात कोळशाचे कण होऊन राहतात, असे बिलप्स यांनी स्पष्ट केले.