आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन: गाजरामध्ये पुरुष वंध्यत्व दूर करण्याची क्षमता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- आतापर्यंत गाजर दृष्टिदोष दूर करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जात होते; परंतु दृष्टीला बळकटी देण्याबरोबरच पुरुषांतील वंध्यत्व दूर करणारे घटकही त्यात असल्याचा संशोधकांचा आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील संशोधकांनी गाजराचे सखोल अध्ययन केले. त्यात हा निष्कर्ष काढण्यात आला. संशोधन प्रकल्पात काही तरुण-तरुणींना विशिष्ट आहारयोजना करून देण्यात आली होती. त्यात फळे-भाजीपाला खाण्यास सांगण्यात आला होता. त्यानंतर या तरुणांची तपासणी करण्यात आली. डाएट देण्यापूर्वी आणि नंतरच्या शुक्राणूंची तपासणी करण्यात आल्यानंतर संशोधकांना ही माहिती मिळाली. पिवळा आणि नारिंगी रंगाचे खाद्य पदार्थ अधिक खाल्ले तर शुक्राणू अधिक बळकट होतात, असे अभ्यासातून लक्षात आले आहे. गाजरामुळे त्याचा दर्जा 6.5 ते 8 टक्क्यांपर्यंत सुधारतो, असे दिसून आले आहे. गोड बटाटे, टरबुजातूनही शुक्राणूंचा दर्जा आणि संख्या वाढते.

नेमके काय करते ?
गाजरामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. जीवनसत्त्व ‘अ’मध्ये वृद्धी होते. त्यातून निरोगी शुक्राणू तयार होण्यास मदत होते. फुलकोबीमधूनही ‘अ’ जीवनसत्त्व मिळू शकते.