आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापडलेली पावणेदोन कोटींची बॅग मूळ मालकाला परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगासमध्ये दररोज हजारो नवे लोक येतात, पण कुणीही कुणावर फार विश्वास ठेवत नाहीत. अशा वातावरणात एका टॅक्सीचालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी गेरार्डो गाम्बोआने एका प्रवाशाला सोडले. मात्र, प्रवाशाची बॅग टॅक्सीतच विसरली. चालकाने बॅग उघडली, तेव्हा सुरुवातीला 100 डॉलर बिलचे बंडल निघाले. मात्र, बंडलमध्ये असंख्य नोटा होत्या. एवढी मोठी रक्कम पाहून चालक थक्क झाला. बॅगमध्ये सापडलेली एकूण रक्कम 1.86 कोटी रुपये एवढी होती.

गेरार्डो तत्काळ टॅक्सी घेऊन यलो चेकर स्टार ट्रान्सपोर्टेशन या त्याच्या टॅक्सी कंपनीच्या मुख्यालयात गेला. पोलिसांनी तपास केल्यानंतर ती बॅग प्रसिद्ध पोकर खेळाडूची होती, हे उघड झाले. एवढी मोठी रक्कम हाती लागल्यावरही ती ठेवून घेण्याचा विचार मनात कसा आला नाही, असे पोलिसांनी गेरार्डोला विचारले असता. तो म्हणाला, ‘मी असे केले असते, तर माझा प्रामाणिकपणा, स्वाभिमान, कुटुंब, माझी कंपनी आणि शहराला मोठी ठेच लागली असती.’ पोकर खेळाडूकडून गेरार्डोला काय बक्षीस मिळाले, याची माहिती नसली, तरी टॅक्सी कंपनीकडून त्याला 62 हजार रुपये देऊन गौरवण्यात आले.