आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cast Cut In Malaysia Airlines , Latest News In Marathi

मलेशिया एअरलाइन्स सहा हजार कर्मचारी घरी पाठवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालम्पूर- यंदा झालेल्या विमान दुर्घटनांत दोन विमान गमवणाऱ्या मलेशियन एअरलाइन्सने हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीत एकूण २० हजार कर्मचारी आहेत. परंतु मोठे नुकसान झाल्यामुळे ही संख्या ३० टक्क्यांनी कमी झाली आहे.

आता ही विमान कंपनी पूर्णपणे सरकारी कंपनी होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे कंपनीची सूत्रे सोपवली जातील. गेल्या काही वर्षांत कंपनी प्रचंड तोट्यात असल्याने मोठा फटका सोसावा लागला. तोटा भरून काढण्यासाठी त्यात सरकारने १.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी वाटा ६९ टक्क्यांनी वाढून १०० टक्के होईल. मलेशिया एअरलाइन्सचे विमान एमएच ३७० ला क्वालालम्पूर ते बीजिंगदरम्यान जाताना दुर्घटना झाली होती.