शेकडो लेण्या कोरून बनवण्यात आली इस्त्रायलची ही बेल लेणी
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
( लेणीच्या आतील भाग )
मध्य इस्रायलचे बेट गुवरीन- मरेशा राष्ट्रीय उद्यानात असलेल्या प्राचीन बेल लेणींचे हे छायाचित्र. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने बेल लेणींचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे.
प्राचीन मरेशा आणि बेट गुवरीन शहराजवळ मानवाने कोरलेल्या शेकडो लेणींची ही मालिका आहे. या लेणी म्हणजे पाषाण युग ते धर्मयुद्धापर्यंतच्या साक्षीदार तर आहेतच शिवाय त्या युगातील भूमिगत बांधकाम शैलीचाही उत्कृष्ट नमुना असल्याचे युनेस्कोने म्हटले आहे.