ज्या हॉलीवूडने भारतीय वंशाची तरुणी रोमाना ब्रिगेंजाला अभिनेत्री होण्याची संधी दिली नाही, त्याच्या अभिनेत्यांना आज तंदुरुस्त राहण्यासाठी तिच्या मागेपुढे करावे लागत आहे. जेसिका अल्बा, हॅल बेरी, अॅनी हॅथवे आणि रेयान रेनॉल्ड यांसारख्या मोठ्या स्टार्सच्या शरीराला तिच्यामुळे आकार आला आहे. गेल्या 25 वर्षांपासून फिटनेस उद्योगात सक्रिय असलेल्या रोमानाचे आई-वडील 30 व्या वर्षी मुंबईहून जर्मनीला गेले आणि त्यानंतर ते कॅनडात आले.
आपल्या 3-2-1 पद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोमानाचे फिजिकल ट्रेनर होण्याचा प्रवास अनेक व्यावसायिक टप्प्यांतून सुरू झाला. रोमानाची खेळातील आवड पाहता आई-वडिलांनी चार वर्षांत जिम्नॅस्टिक शाळेत पाठवले. हायस्कूलमध्ये पोहोचताच ती व्यावसायिक जिम्नॅस्ट झाली होती. यादरम्यान तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी ती कॅनडाहून लॉस एंजलिसला आली. अनेक निर्माते-दिग्दर्शकांच्या कार्यालयात चकरा मारल्यानंतर संधी मिळाली नाही. नृत्य येत होते त्यामुळे अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगची (एनएफएल) टीम लॉस एंजलिस रेडर्सने त्यांना आपला चिअर लीडर बनवले. रेडरेटे ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्यानंतर लोक तिला ओळखू लागले.
कमनीय बांध्यामुळे तिचे मॉडेलिंग जगात पदार्पण झाले. रोमाना मसल अँड फिटनेस यांसारख्या अनेक अव्वल मासिकांसाठी मॉडेलिंग करू लागली. यानंतर त्या
रिबॉक आणि चॅम्पियन्स स्पोर्ट्सच्या जाहिरातींमध्ये दिसली. एमटीव्ही, व्हीएच 1 आणि ई वाहिनी त्यांना फिटनेस तज्ज्ञ म्हणून बोलावू लागले. एकेदिवशी अचानक एका कास्टिंग दिग्दर्शकाने संपर्क साधून चित्रपटातील कथेशी अनुरूप 17 वर्षांच्या जेसिका एल्बाच्या बांध्याला आकार देण्यास सांगितले. यानंतर हे सत्र सुरूच राहिले.
जिम्नॅस्ट म्हणून करिअरला सुरुवात. यानंतर चिअर लीडर, कोरिओग्राफर झाली. मॉडेलिंगही केली आणि आता फिटनेस गाइड