Home | International | China | chaina, america, student, english class

चिनी मुलांची अमेरिकेत इंग्लिश वर्गासाठी झुंबड

वृत्तसंस्था | Update - Jun 27, 2011, 03:14 AM IST

अमेरिकन विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी चीनने चांगलीच कंबर कसली आहे. स्पर्धेत पुढे राहण्यासाठी दर्जेदार इंग्रजी शिकण्यावर भर दिला जात असून, या उन्हाळी वर्गात कधी नव्हे ती फार मोठ्या संख्येने चिनी मुले सहभागी होणार आहेत.

 • chaina, america, student, english class

  बीजिंग: अमेरिकन विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी चीनने चांगलीच कंबर कसली आहे. स्पर्धेत पुढे राहण्यासाठी दर्जेदार इंग्रजी शिकण्यावर भर दिला जात असून, या उन्हाळी वर्गात कधी नव्हे ती फार मोठ्या संख्येने चिनी मुले सहभागी होणार आहेत.
  पालकांनी इंग्रजीची एवढी धास्ती घेतली आहे की या वर्गासाठी ते कितीही शुल्क भरण्यासाठी तयार झाले आहेत. त्यासाठी प्रत्येकी ५ हजार अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च लागणार आहे. या वर्गात ते अमेरिकन विद्यार्थ्यांसोबत खेळणार आहेत. त्यासाठी सुमारे ६० हजार मुले परदेशात जाणार आहेत. मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा हाच फंडा असल्याची भावना चिनी पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. चिनी शैलीच्या शिक्षणासाठी हे अमेरिकन वर्ग चिनी मुलांसाठी पूरकच ठरणार आहेत. शैक्षणिक गुणवत्तेसह एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे वर्ग उपयोगी ठरणार आहेत. या माध्यमातून मुलांना इंग्रजी शिकण्याचा आनंद मिळावा, असा आमचा उद्देश असल्याचे आंतरराष्टÑीय द्वैभाषिक वासंतिक वर्गाचे प्रमुख कॅरोल पेंग यांनी म्हटले आहे.
  परदेशातील शिक्षणाची कवाडे
  अमेरिकन शैलीवर भर असलेल्या या वर्गामुळे परदेशात उच्चशिक्षण घेण्याची दारेही मोकळी होतात. यामुळे पालकांनी यावर अधिक भर दिला आहे. बाल्टिमोर येथील एका वर्गात आपल्याला मुलाला पाठविणारे लू याँग म्हणतात, ही आम्हाला मिळालेली संधी असल्याचे आम्ही मानतो. स्थानिक शाळेत जे शिकायला मिळत नाही, ते शिकण्याची सोय यातून उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
  अमेरिकेची ओळख
  या कॅम्पमधून चीनच्या मुलांना अमेरिकेच्या संस्कृतीची ओळख होणे, हा एक उद्देश यामागे आहे. शिवाय अनेक मुलांना परदेशी शिक्षण घेण्याची संधीही उपलब्ध होते.
  अ‍ॅलेक्स अब्राहम, व्यवस्थापक, ब्लू स्काय स्टडी, शांघाय.

Trending