Home | International | China | chaina, bejengi, biviyatang river

ब्वीयानतांग नदीमध्ये उसळलेल्या लाटा पाहण्यासाठी हजारो पर्यटक दाखल

वृत्तसंस्था | Update - Sep 02, 2011, 02:54 AM IST

दरवर्षी १० ते १४ सप्टेंबरदरम्यान नदीमध्ये मोठ्या लाटा निर्माण होतात. ते पाहण्यासाठी आलेले लोक लाटेच्या फटका-यासरशी किना-यावर फेकले जातात.

  • chaina, bejengi, biviyatang river

    बीजिंग: एक उंच लाट आली आणि नदीकिनारा तुटला. आसपास उभे असलेले लोक पाण्याच्या लाटेत वाहत गेले. हे दृश्य सुनामीचे नव्हे तर चीनच्या झेजियांग प्रांतातील क्वियानतांग नदीत उठलेल्या लाटेमुळे निर्माण झाले. शांघायपासून दोन तासांच्या अंतरावर या ठिकाणी दरवर्षी याचा आनंद लुटण्याची येथील लोकांची परंपरा आहे. दरवर्षी १० ते १४ सप्टेंबरदरम्यान नदीमध्ये मोठ्या लाटा निर्माण होतात. ते पाहण्यासाठी आलेले लोक लाटेच्या फटका-यासरशी किना-यावर फेकले जातात. यावर्षी हे दृष्य लवकर पाहावयास मिळाले. बुधवारी ब्वीयानतांग नदीमध्ये उसळलेल्या लाटा पाहण्यासाठी हजारो पर्यटक जमा झाले होते.Trending