Home | International | China | chaina, bejengi, marrage bureau office, offer

ऑफर। बायको पळून गेली तर मिळेल तरुणी!

वृत्तसंस्था | Update - Sep 03, 2011, 04:58 AM IST

तुमची बायको पळून गेलीय? टेन्शन नका घेऊ... तुम्हाला अगदी तशीच बायको देता येत नसली तरी तिच्या बदल्यात तुम्हाला एक अविवाहित तरुणी नक्कीच मिळेल.

 • chaina, bejengi, marrage bureau office, offer

  पेचिंग: तुमची बायको पळून गेलीय? टेन्शन नका घेऊ... तुम्हाला अगदी तशीच बायको देता येत नसली तरी तिच्या बदल्यात तुम्हाला एक अविवाहित तरुणी नक्कीच मिळेल. पण थांबा.... बातमी वाचून लगेच हर्षभरित होऊ नका... कारण या अफलातून आॅफरचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भारत सोडून चीनमध्ये राहायला जावे लागेल आणि व्हिएतनामच्या मुलीशी लग्न करावे लागेल. चीनमध्ये मॅरेज ब्युरो कार्यालयांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी अशाच अफलातून ऑफर देणा-या जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
  ‘शांघाय डेली’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. त्यात मॅरेज ब्युरो कार्यालयांनी दिलेल्या जाहिरातींचा हवाला देण्यात आला आहे. चीनमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अन्य देशांतील मुलींशी विवाह जुळवून देणा-या वधू - वर सूचक मंडळांची तेथे सध्या चलती आहे. युवकांना 32 हजार डॉलरमध्ये व्हिएतनामच्या युवतीशी लग्न करण्याची ऑफर देण्यात आली आहे. गंमत म्हणजे एकावर एक फ्रीप्रमाणे जर ती बायको पळून गेली तर तुम्हाला एक्स्चेंज म्हणून दुसरी तरुणी देऊन एक वर्षाच्या आत तुमचे लग्न करून दिले जाईल, असे आश्वासनही जाहिरातींमध्ये ठळकपणे देण्यात आले आहे.
  अनेक प्रकरणे उघडकीस
  चीनमधील तरुणांनी आधी डोळे झाकून व्हिएतनामच्या युवतींशी लग्ने केली; परंतु विवाहानंतर या बायका पळून जातात, अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. शंका अशी आहे की, या महिलांना पुन्हा विकले जात असावे. त्यामुळे चिनी पुरुषांना पती म्हणून ओळख तर मिळायची, पण बायको मिळत नसे अन् वर पैसे गेल्याचे दु:ख वेगळेच. फसवणूक होत असल्याने मॅरेज ब्युरोचे ग्राहक घटले होते. त्यांना आकर्षित करण्यासाठी विवाह संस्थांनी वरील प्रकारच्या जाहिरातींचा आसरा घेतला आहे.
  पोलिसांत तक्रार द्यायचीही चोरी
  चिनी तरुणांची दुहेरी अडचण अशी की बायको सोडून पळाली तरी त्याची पोलिसांत तक्रार द्यायचीही त्यांना चोरी आहे. कारण महिलांची खरेदी केल्याप्रकरणी त्यांना अटक, शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अशा अनेक घटना घडल्या
  तरी त्यापैकी मोजकीच प्रकरणे उघडकीस येतात.Trending