आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एच 1बी व्हिसा बदल भारतीय कंपन्यांसाठी नुकसानकारक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या व्हिसा धोरणातील प्रस्तावित बदलाचा सर्वाधिक फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे. संबंधित कंपन्या अमेरिकेतील आपल्या व्यवसायासाठी या व्हिसावर अवलंबून आहेत.


अमेरिकेच्या इमिग्रेशन नियमांमध्ये व्यापक बदल करण्याचा प्रस्ताव संसदेत आला आहे. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होईल. यामध्ये एच1बी व्हिसाचा वापर करणा-या कंपन्यांवर अंकुश लावण्याच्या तरतुदी आहेत. या श्रेणीमध्ये बहुतांश भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. प्रस्तावित कायद्यात भारतीय आयटी कंपन्यांना यापुढे प्रत्येक अतिरिक्त एच1बी व्हिसासाठी 10 हजार डॉलर अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. यामध्ये टीसीएस, विप्रो आणि इन्फोसिस यासारख्या कंपन्या आहेत.

प्रस्तावित कायद्यातील तरतुदी
कंपन्यांना एच1बी व्हिसाधारकाला नोकरीवर ठेवण्यासाठी 30 दिवस आधी अमेरिकेच्या कामगार विभागाच्या वेबसाइटवर जाहिरात देणे आवश्यक आहे.


बिगरअमेरिकी कंपन्या एकूण कर्मचा-यांपैकी 75 टक्क्यांहून अधिक एच 1 बी किंवा एल 1 व्हिसाधारक कर्मचा-यांना ठेवत असेल तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील. अमेरिकी नागरिकांऐवजी परदेशी कर्मचा-यांना प्राधान्य दिल्यास त्याला अटकाव करण्याची तरतूद.