आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शत्रुंना मारून त्यांचे हृदय काढून खायचा हा निर्दयी हुकूमशाहा, आता सतावतेय मृत्युची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सैन्यांशी बोलताना लाइबेरियाचा माजी हुकूमशाहा चार्ल्स टेलर. जुलै, 1990)
लंडनः कोण्याएका काळात तो आपल्या शत्रुंना ठार करून त्यांचे हृदय काढून खायचा. तर नंतर तो लायबेरियाचा हुकूमशाही राष्ट्रपती झाला आणि सध्या तो मानवता विरोधी गुन्ह्यामध्ये डरहम तुरूंगात 50 वर्षांची शिक्षा भोगत आहे. या नरभक्षीचे नाव आहे चार्ल्स टेलर. पूर्वेकडील या हुकूमशहाने आता ब्रिटेनवर खटला दाखल केला आहे. टेलरच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनमध्ये शिक्षा भोगत असताना त्याच्या मानधाविधाकारांचे उल्लंघन होत आहे.
टेलरच्या म्हणण्यानुसार, पत्नीला आणि 15 मुलांना भेटायला त्याला आफ्रिकेवरून यावे लागते. हा प्रवास खुपच त्रासदायक आहे. त्यांच्यावर कधीही कोठेही हल्ला होऊ शकतो. टेलर याने मानवाधिकारांच्या सिध्दांताची आपल्या पध्दतीने व्याख्या केली आहे.

जर या खटल्याचा निकाल टेलरच्या बाजूने लागला, तर हा निर्णय ब्रिटीश मानवाधिकार कायद्यासाठी हास्यास्पद होईल, असे येथील मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

व्हाईटहॉल अधिकार्‍यांनी याला सर्वात लाजीरवाणा खटला म्हटले आहे. त्यांच्या मते, टेलर हा युध्दातील गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याने कुठे शिक्षा भोगावी, अथवा त्याला संसारिक सुख मिळावे याबद्दल काहीही विचारण्याचा हक्क नाही"
पुढे वाचा... कोणत्या खटल्यात टेलरला झाली आहे शिक्षा