आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Attack On Magazine Office In Paris 12 Dead

VIDEO: पॅरिसमध्ये मासिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला; संपादकासह 12 ठार, \'अलकायदा\'वर संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: \'चार्ली हेब्डो\' मासिकाचे संपादक स्टीफेन चार्बोनर यांची दहशतवाद्यांनी हत्या केली.)

पॅरिस- फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील \'चार्ली हेब्दो\' या फ्रेंच मासिकाच्या कार्यालयावर आज (बुधवारी) दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी \'अल्लाह हू अकबर\'च्या घोषणा देत \'चार्ली हेब्दो\'च्या कार्यालयात प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 12 जणांचा मृत्यु झाला आहे. त्यात साप्ताहिकाचे संपादक स्टीफेन चार्बोनर यांचा समावेश आहे. मोहम्मद पैगंबर यांचे कार्टून प्रसिद्ध केल्याने मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत.
 
फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सुआ ओलांद यांनी तातडीने घटनास्थळाची पाहाणी केली असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. मासिकाच्या कार्यालयावर भ्याड हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्‍यात येईल, असेही अोलांद यांनी म्हटले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, क्लाश्निकोव्ह रायफल असलेले हल्लेखोर \'चार्ली हेब्डो\'च्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी एकच अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दोन गाड्यांत पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, दहशतवादी संघटना \'अल कायदा\'ने दोन वर्षांपूर्वी \'चार्ली हेब्दो\' मासिकाचे संपादक आणि संचालक स्टीफेन चार्बोनर यांच्याच्यावर बक्षीस ठेवले होते. स्टीफेन चार्बोनर यांच्या शिर आणणार्‍या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल, असा फसवा अल कायदाने 2013 मध्ये जाहीर केला होता.

स्वतंत्र पत्रकारिता आणि मोकळेपणाने विचार मांडणारे हे मासिक म्हणून \'चार्ली हेब्दो\' हे प्रचलित आहे. या मासिकाने \'डेनिश\' मा‍सिकात प्रसिद्ध झालेले मोहम्मद पैगंबर यांचे वादग्रस्त कार्टून दुसर्‍यांदा प्रकाशित केले होते. त्यानंतर अलकायदाने संपादक स्टीफेन चार्बोनर यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. तरी देखील चार्बोनर यांनी आपल्या मासिकात पैंगबर यांचे कार्टून प्रकाशित करणे बंद केले नाही. आम्ही जगातील अन्य धर्माशीसंबंधित कार्टून बनवू शकतो तर, इस्लाम धर्माशीसंबंधीत कार्टून बनवण्यात काय हरकत आहे, असे चार्बोनर नेहमी म्हणत असत.
 
\'चार्ली हेब्दो\'च्या कार्यालयावर यापूर्वीही झाला आहे हल्ला..
फ्रान्समधील मासिक \'चार्ली हेब्दो\'च्या कार्यालयावर यापूर्वीही झाला होता. 2 नोव्हेंबर,  2011 मध्ये मासिकाच्या कार्यालयावर फायर बॉम्ब फेकण्यात आले होते. हल्ल्यानंतर मासिकाचे कार्यलय नव्या जागेत स्थलांतरित करण्‍यात आले होते.

दुसरीकडे, धार्मिक कार्टून प्रसिद्ध करणार्‍या मासिकाची वेबसाइट दोन वर्षांपूर्वी बंडखोरांनी हॅक केली होती. इस्लाम धर्माशी संबंधित एका सिनेमाला विरोधात अमेरिकेतील मिडिल ईस्ट दूतावासावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ चार्ली हेब्दोमध्ये कार्टून प्रसिद्ध झाले होते. कार्टून प्रसिद्ध झाल्यानंतर मुस्लिम देशांमधील फ्रान्सच्या दूतावासांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
 

पॅरिस हल्लाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याबाबत खेद व्यक्त केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दहशतवादी हल्ल्याची फोटो...