आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोप असो वा पैगंबर सर्वांची खिल्ली उडवली आहे चार्ली हेब्दोमध्ये, पाहा निवडक Cartoon\'s

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - हल्ल्यापूर्वी ट्वीटरवर पोस्ट केलेले बगदादीचे कॅरिकेचर.

पॅरिस - फ्रान्सच्या शार्वी हेब्दो या व्यंगचित्रांच्या प्रसिद्ध साप्ताहिकाच्या कार्यालयावर तीन बंदूकधा-यांनी बुधवारी हल्ला केला. त्यात 10 पत्रकारांसह 12 जणांची हत्या करण्यात आली. मोहम्मद पैगंबराचे कार्टून प्रकाशित करून अनेकदा या साप्ताहिकाने मुस्लिमांची नाराजी ओढवून घेतली होती.
दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये मॅगझीनचे एडिटर-इन चीफ स्टीफन चार्बोनर यांचाही समावेश होता. तसेच जगप्रसिद्ध कार्टूनिस्ट असलेले स्टीफन हेही अल कायदाच्या हिटलिस्टमध्ये होते. त्यांच्याशिवाय इतर तीन प्रसिद्ध व्यंगचित्रकारही या हल्ल्यात मारले गेले. जॉर्जस वोलिनिस्की, बर्नार्ड वर्लहाक आणि जीन केबट अशी त्यांची नावे आहेत. हल्ला झाला त्याच्या काही सेकंदांपूर्वीच मॅगझीनच्या ट्वीटर पेजवर ISIS प्रमुख अल-बगदादी याचा एक फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यात बगदादीच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करण्यात आली होती.

अनेक प्रसिद्ध व्यंगचित्रकार
47 वर्षीय चार्बोनर चार्ब नावानेही ओळखले जात होते. चार्ब 2009 पासून शार्ली हेब्दोचे डायरेक्टर होते. 2012 मध्ये त्यांचे एक वक्तव्य चांगलेच गाजले होते. गुडघ्यावर बसून जगण्याऐवजी मी उभे राहून मरणे पसंत करेन, असे ते म्हणाले होते. 76 वर्षीय केबट 'केबू' नावाने प्रसिद्ध होते. फ्रेंच वाहिन्यांवर नियमित दिसणा-या चेह-यांपैकी ते एक होते. अनेक साप्ताहिकांसाठी, मासिकांसाठी त्यांनी काम केले होते. 57 वर्षीय वर्लहाक 'टिगनस' नावाने प्रसिद्ध होते. 80 वर्षीय वोलिनिस्की शार्ली हेब्दो मॅगजीनच्या संस्थापकांपैकी एक होते. ते 60 च्या दशकापासून कार्टून काढायचे. दहशतवाद्यांनी हत्येपूर्वी त्यांना नाव विचारले होते, अशा बातम्याही आल्या आहेत. तसेच पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेतल्याचेही ते म्हणत होते.
मुस्लिमांची अधिक नाराजी
कट्टर डाव्या विचारांनी प्रेरित असलेल्या या साप्ताहिकात धार्मिक कट्टरपंथींपासून राष्ट्राध्यक्षांपर्यंत अनेकांची खिल्ली उडवली असल्याचा इतिहास आहे. पोप असो, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी, नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, यहुदी समुदाय असो वा मोहम्मद पैगंबर असे सर्वांचेच कार्टून प्रकाशित करण्यात आले होते.
2006 मध्ये मॅगझीन एका वृत्तपत्रात छापलेले पैगंबरांचे कार्टून पुन्हा छापल्याने प्रकाशझोतात आले होते. त्यावेळी अनेक मुस्लीम संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता. नोव्हेंबर 2011 मध्ये मॅगझीनने प्रकाशित केलेल्या अंकात पैंगंबरांना गेस्ट एडिटरचा दर्जा देण्यात आला होता. तसेच कव्हरवर पैगंबरांचे कॅरिकेचरही छापण्यात आले होते. त्यानंतर दुस-याच दिवशी साप्ताहिकाच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला झाला होता.

एखा वर्षानंतर एका तथाकथिक मुस्लिमविरोधी चित्रपटाबाबत वाद सुरू असताना मॅगझीनने पैगंबरांचे आणखी काही कार्टून प्रकाशित केले होते. त्यापैकी एकामध्ये तर पैगंबरांना नग्न दाखवण्यात आले होते. त्यानंतर एवढा तणाव वाढला होता की, फ्रान्स सरकारला अनेक मुस्लीम देशांमधील दुतावासही बंद करावे लागले होते. त्यावेळी चार्ब म्हणाले होते की, पैगंबर माझ्यासाठी पवित्र नाहीत. माझे कार्टून पाहून मुस्लिम हसले नाही, तर मी त्यांना दोषी मानू शकत नाही. मी फ्रान्सचे कायदे पाळतो, कुरानचे नियम नाही.

पुढे पाहा, साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आलेले काही निवडक कार्टून