आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बेल्जिअमच्या या जंगलात आहे कारचे कब्रस्तान, 70 वर्षांपासून तशाच आहेत उभ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेल्जिअमच्या जंगलात लपवून ठेवण्यात आलेल्या कार
दक्षिण बेल्जिअमच्या जंगलात लपवून ठेवण्यात आलेल्या कारची मुळ कहानी कुणालाच ठाऊक नाहीये. लग्जबर्गम प्रांतात चॅटीलोन हे गाव आहे. याला आज कारचे कबरस्तान म्हटले जाते. 70 वर्षांपासून जंगलाच्या या रस्त्यात जाम लागलेला आहे. परंतु रस्ता न मिळल्याने लोक इथेच या कार सोडून गेले असतील, असा अंदाज बांधला जातो.
याव्यतिरिक्त सांगितले जाते, की दुस-या महायुध्दानंतर अमेरिकेचे सैनिक घरी परताना आनंदाच्या भरात या कार येथे लपवून निघून गेले होते. हे ठिकाण थोडे उंचीवर आहेत. परंतु त्यांना हे ठिकाण योग्य वाटले होते. स्थानिक लोक या गोष्टींशी निगडीत राहत नाही. त्यांचे म्हणणे आहे, की हे ठिकाण जून्या कारचा अड्डा आहे. कार जूनी झाल्यास कोणताही व्यक्ती ती इथे सोडून जातो.
चॅटीलोनमध्ये कारचे असे चार ग्रेवयार्ड आहेत. तिथे 500पेक्षा जास्त जून्या कार ठेवण्यात आल्या आहेत. काही कार आसपासचे लोक घेऊन गेले आहेत. काहींनी कारमधील मशीन्स नेले आहेत. 2010मध्ये जून्या कारमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने काही कार काढून दुस-या ठिकाणी नेऊन नष्ट केल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जून्या कारच्या अड्याची छायाचित्रे...