आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकागोचा चेहरा बदलला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे तिसरे सर्वाधिक मोठे शहर शिकागोचे महापौर रॅम इमानुएल यांना गुन्हे आणि हत्या रोखण्याच्या कामात यश मिळाले असले, तरी आपल्या डेमोक्रॅटिक सहका-यांकडून होणा-या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. शहराच्या स्कूल बोर्डाने घेतलेल्या 50 शाळा बंद करण्याच्या निर्णयाला प्रचंड विरोध होत आहे. शाळेच्या बजेटमध्ये 56 अब्ज रुपयांचा तोटा झाल्यामुळे महापौरांनी निकृष्ट निकाल देणा-या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. शिकागो शिक्षक संघाच्या अध्यक्षा करेन लेविस यांनी इमानुएल यांना खुनी महापौर म्हटले आहे. कृष्णवर्णीय विद्यार्थी आणि शिक्षक असलेल्या शाळांना लक्ष्य केल्याचा आरोप कित्येक नेत्यांनी केला आहे.


सध्याच्या या अस्थिरतेशिवाय महापौरांसाठी 2012 हे वर्ष चढउतारांचेच राहिले आहे. कृष्णवर्णीयांमुळे 2012 मध्ये त्यांचा विजय सोपा झाला होता. त्यांच्यावरील त्यांचा प्रभाव आता कमी झाला आहे. त्यांची लोकप्रियतेची समग्र रेटिंग 50 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. वरवरच्या गोष्टींवर सुखी राहणाºया समाजघटकांनी शाळा सुधारणा, नगरविकास, पायाभूत सुविधांमधील सुधार, जॉब ट्रेनिंग यांसारख्या मुद्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस यंत्रणेत केलेल्या बदलांमुळे गुन्हेगारी नियंत्रणात आली आहे, परंतु यामुळे ते नागरिकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत.
या विभाजित शहराची ओळख असंतोषाला संघर्षात बदलण्याची झाली आहे. कार्ल सेंडबर्ग शिकागोचे वर्णन ‘वादळी, कोरडे व उपद्रवी’ असे करतात. रिचर्ड डेली यांच्या 22 वर्षे महापौरपदाच्या कारकीर्दीनंतर जिंकलेल्या इमानुएल यांना रिकामी तिजोरी मिळाली. शिकागोमध्ये निधीचा अभाव, गुन्हेगारी, विषमता, वर्णभेद, तीव्र बेकारी, मागास शाळा आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा अशा असंख्य समस्या आहेत. या सगळ्यांच्या विरोधात इमानुएल यांनी आघाडी उभारली. ते म्हणतात, येत्या दोन-तीन वर्षांत आम्ही असे निर्णय घेऊ जे आगामी वीस-तीस वर्षांची शिकागोची स्थिती ठरवतील. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे सल्लागार आणि ओबामांचे माजी चीफ ऑफ स्टाफ राहिलेले इमानुएल यांची वॉशिंग्टन, हॉलिवूड आणि न्यूयॉर्कच्या कॉर्पोरेट जगतात चांगली प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या निर्णयांची अंमलबजावणी कठीण नाही.


हिंसाचाराच्या घटना वाढल्यामुळे सत्तेत आल्यानंतरचे पहिले वर्ष इमानुएल यांच्यासाठी फारच कठीण राहिले. शिकागोमध्ये 2012 मध्ये 500 पेक्षा जास्त खून झाले. 2004 नंतर दुस-यांदा असे घडले होते. त्यांनी अशा शहराची सूत्रे स्वीकारली होती, ज्यात गुन्हेगारीचे प्रमाण सतत घटत राहिले. हा राष्ट्रीय ट्रेंड होता. परंतु न्यूयॉर्क, लॉस एंजलिसमधील घटते प्रमाण शिकागोपेक्षा अधिक होते. हिंसाचाराची समस्या दक्षिण आणि पश्चिम भागातील वस्त्यांमध्ये जास्त आहे. येथे पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचार, ढासळता शिक्षण स्तर, घरांच्या समस्यांना कृष्णवर्णीय युवकांमध्ये हिंसाचाराचे कारण मानले जाते. शहरातील तीन टक्के रियल इस्टेट 20 टक्के हत्यांचे कारण बनले आहे. शिकागोच्या 40 टक्के विशेषत: उत्तर भागात गेल्या वर्षी हत्येची घटना घडली नाही. ज्युनियर डेली यांच्या प्रदीर्घ काळात रॉबर्ट टेलर होम्स आणि केबरिनी ग्रीनसारखे कुख्यात गरीब निवासी क्षेत्र उद्ध्वस्त केले गेले. मात्र, त्यामुळे गुन्हेगारी कारवाया मध्यमवर्गीय भागात पसरल्या.


पद सांभाळल्यानंतर इमानुएल यांनी न्यूयॉर्कचे पोलिस आयुक्त गॅरी मॅक् कार्थी यांना पोलिसप्रमुख नियुक्त केले. गुन्हेगार आणि संभाव्य हिंसक कारवायांची माहिती मिळवण्यासाठी अधिका-यांना रणांगणावर उतरवण्याची योजना आखली. गुन्हे घडल्यानंतर सक्रिय होण्यापेक्षा आगाऊ तयारीवर भर दिला. त्यासाठी विभागाची फेररचना केली. बदलाचे परिणाम तत्काळ दिसले नाहीत. गुन्हे कमी झाले, पण हत्यांची संख्या वाढली. हिंसाचारग्रस्त भागात ओव्हरटाइम देऊन पोलिस बंदोबस्त वाढवला. हळूहळू त्यांनी केलेल्या सुधारणांचे परिणाम दिसू लागले. 2013 मध्ये 6 मेपर्यंत हत्येच्या 102 घटना घडल्या. 2012 मध्ये हा आकडा 167 होता. मात्र, बहुतेक लोक पोलिसांच्या या कारवायांमुळे नाखुश आहेत.


गुन्हेगारी रोखण्यासह रस्ते दुरुस्ती, सफाई, पार्किंग, बांधकाम परवाने अशा कामांकडे त्यांचे लक्ष आहे. सोबतच उद्योगपती, व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठीही त्यांचा प्रयत्न आहे. मेयरला सगळीच कामे करावी लागतात. यासह शाळा सुधार, रोजगारनिर्मितीत योगदान, रस्ते सुरक्षित ठेवणे कार्यक्रम यादीत अग्रभागी आहेत. दोन अध्यक्षांसोबत त्यांनी काम केल्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामातून दिसते.


506 एक विभाजित शहर
खून 2012 मध्ये शिकागो शहरात झाले. दक्षिण, पश्चिम भागात हे प्रकार अधिक घडले. या भागात दरडोई उत्पन्न कमी आहे.
54% किशोर आणि युवक
गुन्हेगार वयाच्या 15 ते 24 दरम्यानचे आहेत. हिंसेचे 44 टक्के बळीही याच वयाच्या दरम्यान आहेत. 2013 मध्ये 82 खून गोळ्या घालून झाले.
सर्वाधिक हत्या
अमेरिकेतील तीन बड्या शहरांपैकी एक असलेल्या शिकागोत हिंसाचार जास्त आहे. 2012 मध्ये प्रति एक लाख नागरिकांमागे हत्यांचे प्रमाण
०न्यूयॉर्क शहर5
०लॉस एंजेलिस7.8
०शिकागो18.6
शिकागोत बहुतांश खुनी आणि मृत कृष्णवर्णीय
हिंसाचारग्रस्त
०श्वेत3%
०कृष्णवर्णीय77%
०हिस्पॅनिक20%
गुन्हेगार
०कृष्णवर्णीय77%
०हिस्पॅनिक20%
०श्वेत3%