आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंबडीच्या अंड्याच्या मदतीने तिला प्राप्त झाले मातृत्त्व; गोंडस कन्येला दिला जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील लिव्हरपूल येथे एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ती म्हणजे एका 23 वर्षीय महिलेला कोंबडीच्या अंड्याच्या मदतीने मातृत्व प्राप्त झाले आहे. लॉरेन डोनाकी असे या महिलेचे नाव आहे. लॉरेन आतापर्यंत तब्बल सहा वेळा गर्भवती झाली होती. परंतु प्रत्येकवेळा तिचा गर्भपात झाला. लॉरेन 17 वर्षाची असताना तिचा पहिल्यांदा गर्भपात झाला होता.

डॉक्टरांनी सांगितले, की लॉरेनच्या गर्भाशयात किलर सेल मोठ्या प्रमाणात आहेत. किलर सेल्स भ्रुण नष्ट करून टाकतात. लॉरेनवर उपचार करताना डॉक्टरांनी 'एग यॉल्क'ही आधुनिक ट्रीटमेंट आत्मसात केली. ट्रीटमेट यशस्वी ठरली आणि गेल्या 17 जानेवारीला एक गोंडस मुलीला जन्म दिला.

असा केला अंड्याचा उपयोग...
डॉक्टरांनी कोंबडीच्या अंड्यातील पिवळा बलक, सोयाबिन तेल, ग्लिसरीन आणि पाणी यांचे मिश्रण करून 'इंट्रालिपिड्‍स' तयार केले. 'इंट्रालिपिड्‍स'मध्ये इम्यूनो-सप्रेसन्ट तत्त्व असतात. गर्भधारणेच्या आधी हे सोल्यूशन ड्रीपच्या माध्यमातून लॉरेनच्या रक्तात मिसळण्यात आले. यामुळे किलर सेल्स कमकूवत पडून त्याचा भ्रुणवर कोणताही परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे गर्भाची व्यवस्थीत वाढ होत होती.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, लॉरेन डोनाकीची छायाचित्रे...