आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Born To Die Ratio High In India Against America

अर्भके दगावण्याचे प्रमाण भारतात जास्त; वैद्यकीय सुविधा नसल्यानेच मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- मुदतपूर्व जन्मलेल्या अर्भकांच्या दगावण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी अशी ३.६ लाख मुले वयाच्या पाच वर्षांपूर्वीच दगावत असल्याचे, लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या संशोधनात दिसून आले.

जगभरात वर्ष २०१३ मध्ये ६.३ कोटी पाच वर्षांच्या आतील बालकांचे मृत्यू झाले. पैकी १.१ कोटी मृत्यूंचे कारण हे मुदतपूर्व प्रसूतीतील गुंतागुंत हे आहे. यातील ९ लाख ६५ हजार मृत्यू हे पहिल्या २८ दिवसांत झाले आहेत. तर इतर मृत्यू वयवर्षे पाचच्या आत झाल्याचे जॉन हॉपकिन्स ब्लूबर्ग येथील संशोधक रॉबर्ट ब्लॅक यांनी सांगितले. अशा अर्भकांना संसर्ग होण्याच्या शक्यता जास्त असतात, त्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा न मिळाल्यानेच हे मृत्यू आेढवतात.