आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Its Miserable:जाणून घ्‍या, जगभरात मुलींवर होणा-या शोषणाविषयी..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील सर्व विकसनशील देशांमध्‍ये मुलींची स्थिती भयावह आहे. त्यांना मुलभूत हक्क तर दिले जातच नाही. पण त्यांचा बालहक्कही काढून घेण्‍यात आले आहे. मुलींचे जबरदस्तीने विवाह लावून दिले जाते. यातील काहींचे वय पाच वर्ष इतकेच आहे. तसेच मुलांचाही बालविवाह लावला जातो. पण यात मुलींची संख्‍या जास्त आहे.आई-वडील आपले कर्ज आणि परंपरामुळे अशा प्रकारचे विवाह लावून देतात. नवरा मुलगा वयाने मोठा असल्याने मुलींचे शोषण मोठ्याप्रमाणावर केले जाते.

जगभरातील बालकांसाठी काम करणा-या युनिसेफच्या आकड्यांनुसार मागील तीन दशकांमध्‍ये बालविवाहाच्या घटनांमध्‍ये घट झाली आहे. आज जगात 70 कोटी अशा महिला आहेत. ज्यांचे विवाह बालपणीचे झाले आहे. कमी वयात गर्भ धारण केल्याने बाळ आणि आईवरही वाईट परिणाम होतो.

कमी वयात झालेल्या बालविवाहामुळे मुलींमध्‍ये मानसिक आजारामुळे तणावात जाण्‍याची शक्यता 41 टक्के इतके असते. बालमातांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त असते. असे असतानाही आग्नेय आशिया, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील काही देशांमध्‍ये आजही बालविवाहासारखी क्रूर पध्‍दत चालूच आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा बालविवाहाचे शिकार झालेल्या मुलींचे छायाचित्रे....