आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांकडून आईवर दिवसाकाठी 300 प्रश्नांचा भडिमार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आईला मुलाकडून दररोज होणा-या सरासरी 300 प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागतो. त्यातच मुलगी असेल तर ती खूपच जिज्ञासू असल्यामुळे हा भडिमार आणखी वाढतो, असे नव्याने करण्यात आलेल्या एका अध्ययनात आढळून आले आहे.


ब्रिटनमध्ये आई ही सर्वाधिक जास्त विचारले जाणारी व्यक्ती आहे. दर तासाला एखाद्या शालेय शिक्षकाला किंवा डॉक्टर किंवा परिचारिकेला जेवढे प्रश्न विचारले जात नाहीत, त्यापेक्षाही जास्त प्रश्नांच्या भडिमाराला तिला सामोरे जावे लागते, असे संशोधकांना आढळून आले आहे. ब्रिटनधील 1,000 आर्इंचे अध्ययन करण्यात आले. चार वर्षे वयाच्या मुली प्रचंड जिज्ञासू असतात आणि त्या आईला दररोज वेगवेगळे 390 प्रश्न म्हणजेच दर एक मिनिट 56 सेकंदाला एक प्रश्न विचारतात, असे या संशोधनात आढळून आले आहे.


मुलांकडून आईला जेवणाच्या वेळेला सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. त्या खालोखाल शॉपिंग किंवा फेरफटका मारताना आणि रात्री झोपताना गोष्टी सांगत असताना प्रश्न विचारले जातात. वयोमानानुसार मुलांच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीत बदल आढळून आला आहे. नऊ वर्षांचा मुलगा आईला सरासरी 144 प्रश्न विचारतो. त्याच्या प्रश्न विचारण्याचे हे प्रमाण 5 मिनिटे 12 सेकंदाला एक प्रश्न असे आहे.


105120 प्रश्न मुलांकडून आईला वर्षभरात विचारले जातात. त्याप्रश्नांना सामोरे जाण्याएवढे आईचे
ज्ञानही नसते.
82 टक्के मुले एखादा प्रश्न पडल्यास वडिलांकडे जाण्याऐवजी आईकडेच जाऊन तिला प्रश्न विचारतात.
24 टक्के मुलांच्या मते वडील ‘तुझ्या आईला विचार’ असे सांगून अंग काढून घेत असल्यामुळे पहिल्यांदा आईकडेच जाऊन प्रश्न विचारतात.


12.5 तास प्रश्नांचा भडिमार
सकाळी 7 वाजून 19 मिनिटाला नाश्त्यापासून ते सायंकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी चहाच्या वेळेपर्यंत प्रत्येक आईला दिवसातील 12.5 तास सत्त्व परीक्षा घेणा-या विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रश्न विचारण्याचे हे प्रमाण दर एक मिनिट 36 सेकंदाला एक प्रश्न असे आहे.


डोके किर्र करणारे प्रश्न
मुले आईला विविध प्रश्न विचारून भंडावून सोडतात. त्यापैकी काही प्रश्न: ‘पाणी ओलेच का आहे?, सावल्या कशाने तयार होतात?’ असे एकापेक्षा एक अवघड प्रश्न आणि ‘आम्हाला शाळेत का जावे लागते? तू एवढी मोठी का आहेस?’