आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयावह: सिरियातील यादवीचे बळी ठरताहेत चिमुरडे; नखे उपटून दिला जातोय शॉक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमिश्क- बशर-अल-असद सरकारने सिरियातील सर्वसामान्य जनतेवर अमानूष अत्याचार सुरु केला आहे. तो जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. अंतर्गत यादवीने सिरीयातील चिमुरड्यांना लक्ष केले आहे. विविध पद्धतीने लहान मुलांवर अत्याचार करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या‍ अहवालातही ही बाब उघडकीस आणली आहे. सिरियातील लहान मुलांचे अपहरण करून त्‍यांची नखे उपटली जात आहे. याशिवाय त्यांच्या गुप्‍तांगावर विद्युत करंट (इलेक्‍ट्रीक शॉक) दिला जात आहे. चिमुरड्यांवर असे अत्‍याचार करून त्यांना गुलाम बनविले जात असल्याचे 'द मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृतात म्‍हटले आहे.
एकीकडे सिरियाचे लष्कर लहान मुलांना ओलीस ठेऊन त्‍यांच्यावर अत्याचार करत असताना दुसरीकडे सिरियातील बंडखोर मुला-मुलींचे अपहरण करून त्यांचे लैंगिक शोषण करत आहेत. बंडखोर आणि सिरियाच्‍या लष्कराकडून हे अघोरी कृत्य केले जात आहे.
सिरियात निर्माण झालेल्या कलहामुळे हजारो मुलांना ओलीस ठेवण्‍यात आले आहे तर शेकडो मुले बेपत्ता असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा प्रमुख बान की मून यांनी लष्‍कर आणि बंडखोरांना आवाहन केले आहे. चिमुरड्यांवर अत्याचार करू नका, त्यांचे संरक्षण करा, त्‍यांच्‍या अधिकाराचे रक्षण्‍ा करा, अशी विनंतीही मून यांनी केली आहे. मार्च 2011 ते 15 नोव्हेंबर 2013 या काळात लहान मुलांवर अत्‍याचार, लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढले होते. मात्र, त्यानंतर परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती. परंतु, ती जास्‍तच बिकट झाली असून चिमुरड्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करून जाणून घ्‍या, चिमुरड्यांवरील होणार्‍या अत्‍याचाराबाबत...