आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनमुळे लहान मुलांची झोप टळते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- टॅब्लेट्स अथवा स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांची झोप ही उपकरणे न वापरणाऱ्या मुलांपेक्षा कमी असते, हे एका अध्ययनाअंती समोर आले आहे. अमेरिकेत झालेल्या या संशोधनात २ हजार शाळकरी मुलांचे निरीक्षण करण्यात आले. यानुसार टीव्हीपेक्षा स्मार्टफोन किंवा टॅब्लेट्ससारख्या स्मॉल स्क्रीनमुळे मुलांच्या झोपेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. स्मॉल स्क्रीन वापरणाऱ्या मुलांची झोप सुमारे २१ मिनिटे टळते, तर बेडरूममध्ये टीव्ही असलेल्या मुलांची झोप १८ मिनिटे टळते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.