आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षाच्या थीमवर बनवले मुलांचे हॉस्पिटल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियातील ब्रसि्बेनमध्ये नोव्हेंबर २०१४ मध्ये लेडी शिलेंतो चिल्ड्रन हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. याचे डिझाइन इतके चांगले झाले की, अनेकांनी या हॉस्पिटलेच बांधकाम करणाऱ्या एजन्सीचे नाव आणि याच्या संकल्पनेवर विचारणा केली होती. ल्यॉन्स अँड कॉनरेड गार्गेट या कंपनीने या इमारतीचा आराखडा बनवला असून मुलांचे हॉस्पिटल सगळ्यापेक्षा वेगळे आणि आकर्षक बनले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी लिव्हिंग ट्री अशी थीम निवडली. तिच्या रंगाची निवड करण्यासाठी बोगनवेलीचे झाड नजरेसमोर ठेवले. ते वेगवेगळ्या रंगात असते. त्यामुळे हॉस्पिटलच्या भिंती आणि बहुतांश खिडक्यांना हिरवा आणि वांग्याच्या रंगासारखा रंग दिला.
मल्टि टेरेस असलेल्या या इमारतीचे इंटेरिअर सगळ्यात वेगळे करण्यात आले आहे. मुले ज्या गोष्टी पाहून खुश होतील अशा वस्तू तेथे वापरण्यात आल्या. प्रत्येक टेरेसला नैसर्गिकपणा यावा म्हणून बाग तसेच हिरवळ बनवण्यात आली आहे.
dezeen.com