आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक- ब्रिटनच्या मुलांचा आनंद हरपतोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन । एखाद्या देशाचे भविष्य जाणून घ्यायचे असल्यास तेथील नवीन पिढीच्या भावना महत्त्वाच्या ठरतात, असे म्हटले जाते. निदान या गोष्टीमुळे तरी ब्रिटनच्या चिंता वाढल्या असतील. कारण देशातील किशोरवयीन मुलांमध्ये आनंदी राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घसरू लागले आहे. द चिल्ड्रन्स सोसायटीने केलेल्या पाहणीत देशातील ही स्थिती समोर आली आहे.

ब्रिटनच्या मुलांना आपली शाळा, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यावरून ही मुले असमाधानी आहेत. म्हणूनच किशोरवयीन मुलांच्या आनंदाची पातळी घसरू लागली आहे. 14 ते 15 या वयोगटातील मुलांवर याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यातील पंधरा टक्के मुलांना आपले राहणीमान अयोग्य वाटू लागले आहे. ही भावना आठ वर्षे वयोगटातील 4 टक्के मुलांमध्येदेखील आहे. पाहणी करणार्‍या संस्थेने आठ ते सतरा वर्षे वयोगटातील 42 हजार मुलांशी संवाद साधला. त्यावरून पालकांना मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत.