आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणीच अकाली वृद्धत्वाचा धोका, लठ्ठपणामुळे अमेरिकेची नवी पिढी विविध आजारांच्या विळख्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे. 1980 नंतर 2 ते 19 वर्षे वयाच्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा तिपटीने वाढला आहे. लठ्ठपणामुळे मुलांना लहान वयातच प्रौढांचे आजार होत आहेत.
किंबर्ले रोड्स या विद्यार्थिनीच्या वैद्यकीय अहवालावर एक नजर टाकल्यास अमेरिकेच्या 21 व्या शतकातील आरोग्य समस्या लक्षात येतात. गेल्या तीन वर्षांत त्याचे वजन 8.6 किलोने वाढले आहे. त्याच्या शरीरात इन्सुलीनची पातळी घसरू लागली आहे. ही मधुमेहपूर्व अवस्था आहे. यकृतावर चरबीचे अनेक थर साठल्याने त्याला सोरायसिस झाला. यकृतात एन्झाइम निर्मितीचे प्रमाण 84 टक्के घटत आहे. सध्या त्याचा रक्तदाब सामान्य आहे. फॅमिली डॉक्टर आणि पोटविकार तज्ज्ञ त्यावर नियमित उपचार करत आहेत. लठ्ठ किंवा जास्त वजनाच्या दोन तृतियांश प्रौढ अमेरिकींची अशी अवस्था आहे.
किंबर्ले तेरा वर्षांची आहे. तिची आई स्टेसी सांगते, ‘पोरीची अवस्था पाहून खूप वाईट वाटते. कोणालाही हे ऐकावेसे वाटणार नाही की, तुमचे मूल आजारी आहे आणि त्याला असा आजार आहे की, त्यात त्याचा मृत्यू होऊ शकतो. हे अमेरिकन दु:स्वप्न आहे.’ जन्माच्या वेळीच कळले की, या मुलाचे संभाव्य आयुष्य आई-वडिलांपेक्षा कमी असू शकते. स्थूल मुलांना हृदयरोग मधुमेह, ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो. सामान्य वजनाच्या मुलांपेक्षा त्यांना स्थूलतेमुळे कर्करोगासारखे अनेक असाध्य आजार जडण्याची शक्यता असते.
अवघ्या दहा वर्षांत तारुण्यात प्रवेश करणारी मुलेही त्याच वेगात वार्धक्याकडे झुकत आहेत. त्यांचे क्रोमोझॉम वृद्धांप्रमाणेच झीजण्याचे संकेत देतात. आई-वडील किंवा आजी-आजोबांप्रमाणे त्यांच्या पेशींची झीज होत आहे. त्यांच्या पेशी मायोक्रोस्कोपखाली ठेवल्यास त्या एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या पेशींसारख्या वाटतील.
लाखो शाळकरी मुलांना अशी औषधे दिली जात आहेत, जी चाळीशीच्या आतील कोणाही व्यक्तीला दिली जात नाहीत.
उच्च कोलेस्टेरॉल, हायपरटेन्शन आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांना प्रौढांची औषधे दिल्याने काही दुष्परिणाम दिसतील. साठ वर्षे वयाच्या व्यक्तीला अशा आजारांची औषधे वीस वर्षांपर्यंत घ्यावी लागतील, तर दहा वर्षांच्या मुलाला ती 70 वर्षे खावी लागतील. अशा औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. उदा. पोटाचे विकार, मांसपेशींची मकमजोरी, थकवा आदी.
लठ्ठपणाच्या समस्येत यकृताच्या निकामी पेशी कधी बर्‍या होऊ शकत नाहीत. स्थूलतेमुळे चयापचय क्रियेत असे बदल होऊ शकतात की नंतर भले वजन कमी होईल, अन्नपचनाची प्रक्रिया पूर्वीसारखी राहणार नाही. ह्युस्टनच्या इवा आमेडोर यांनी गेल्या वर्षी आपल्या 10 वर्षीय एरिक या मुलाची आरोग्य तपासणी केली. त्याची उंची 4 फूट 8 इंच आणि वजन 48 किलो होते. त्यांना वाटले नंतर त्याचे वजन घटेल. मात्र रक्त तपासणी पाहिल्यावर इवा थक्क झाल्या. त्यांचे कोलेस्टेरॉल 266 पर्यंत पोहोचले होते. डॉक्टरांनी यकृताचे अल्ट्रासाउंड के ले. त्यात दिसले की त्याच्या यकृताचा आकार गरजेपेक्षा मोठा होता. बायोप्सीतून स्पष्ट झाले की, यकृताची अशी अवस्था शक्यतो वयाच्या पन्नाशीत होते.
अमेरिकेत अशा मुलांची संख्या गेल्या काही वर्षांत दुप्पट झाली आहे. 1988 ते 1994 दरम्यान 4 टक्के मुले फॅटी लिव्हरने त्रस्त होते. 2007 ते 2010 या काळात ते 11 टक्के झाले. चरबीमुळे यकृताच्या पेशी खराब झाल्याने मुलांना पुढे सोरायसीस होऊ शकतो. मेयो क्लिनिकमध्ये एजिंग सेंटरचे संचालक जेम्स किर्कलँड सांगतात, स्थूलतेत होणारे बदल म्हातार्‍या माणसासारखे असतात. पेशींवर साठलेल्या चरबीमुळे इतर पेशींचे आयर्मानही कमी-जास्त होऊ लागते. अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये मुलांच्या स्थूलतेवर नजर ठेवण्यासाठी कार्यक्रम सुरू केले आहेत.

लठ्ठपणामुळे अनेक आजारांना निमंत्रण
जास्त वजनाच्या मुलांना लवकर प्रौढत्व येईल. प्रौढांना होणारे आजार त्यांना होतील. प्रमाणापेक्षा जास्त वजन शरीरावर कशा प्रकारे परिणाम करेल वाचा, पुढील स्लाइडमध्ये...