आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिली: जंगलातील भीषण आग पोहोचली वालपरासो शहरात, 2000 घरे खाक तर 12 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वालपरासो- लॅटिन अमेरिकेतील चिली देशातील वालपरासो शहरात भीषण आग भडकली आहे. यात 2000 हजार घरे जळून खाक झाली असून आतापर्यंत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हजारों लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले आहे. समुद्र किनार्‍यावर वसलेल्या वालपरासोमधील जंगलात शनिवारी (13 एप्रिल) ही आग लागली होती. आता ही आग शहरात पसरली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. अग्निशमन दलाचे सुमारे1200 जवान शर्तीचे प्रयत्न करत आहे.

सुमारे 1700 एकर जंगल परिसरात ही आग पसरली आहे. आता ही आग शहरात पोहोचली आहे. या भागात बहुतांश घरे लागडी आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेले यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. तांबे उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या वालपरासो शहराला आगीने वेढले आहे. ला क्रूज आणि लास कनासमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गुइलेमेरो द ला माजा यांच्या मते, वेगात हवा सुरु आहे. त्यामुळे आग झपाटयाने पसरत आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा आगीची भीषणता...