आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान वाटे करणे हा चिंपाझींचाही स्वभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समान वाटे करणे हा चिंपाझींचाही स्वभाव
नि:पक्षपातीपणा हे नेहमी मानवाचे वैशिष्ट्य मानले गेले आहे. मात्र, आता शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे की, फक्त माणसेच नाही तर चिंपांझींमध्येही हा गुण आढळून येतो. संशोधकांनी या प्रयोगात दोन ते सात वर्षांपर्यंतची 20 चिंपांझींची पिले आणि सहा प्रौढ चिंपांझींसोबत ‘फेअरनेस’ हा गेम खेळला. यावरून त्यांना आढळून आले की, माणसांवर करण्यात आलेल्या प्रयोगांच्या परिणामांशी ते मिळतेजुळते होते. अटलांटातील इमोरी विद्यापीठात येर्केस नॅशनल प्रायमेट रिसर्च सेंटरचे डॉक्टर डार्बी यांच्या मते, त्यांनी ‘अल्टिमेटम गेम’ चा उपयोग केला.माणसांमधील नि:पक्षपातीपणा किती गंभीर आहे हे या खेळावरून दिसून आले. या संशोधनातील निष्कर्ष प्रोसिडिंग्स ऑ फ द नॅशनल अकॅडमी ऑ फ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

खेळ सुरू करण्याआधी बक्षिसाचा निर्णय घेण्यात येतो. दोन्ही पक्ष बक्षीस वितरणावर सहमत होतात तेव्हाच खेळाला सुरुवात होते. माणूस सामान्यत: आपल्या जोडीदाराला बक्षिसातील 50 टक्के भाग देतो. चिंपांझींच्या अध्ययनातही ही बाब आढळून आली. चिंपांझी त्यांच्या हाती आलेल्या साहित्य किंवा अन्नाचे एकसारखे भाग करतात हे संशोधनाअंती दिसून आले आहे.
discoverynews.com