Home | International | China | china- heavy rain, 94 people dead, international

चीनमधील झायनिग शहरात महापूर, ९४ जणांचा मृत्यू

agency | Update - Jun 13, 2011, 09:47 AM IST

गेल्या तीन दिवसपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे चीनमध्ये महापूर आला आहे.

  • china- heavy rain, 94 people dead, international

    बीजिंग- चीनमध्ये काही भागात दुष्काळाची परिस्थिती असली तरी गेल्या तीन दिवसपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे चीनमध्ये महापूर आला आहे. त्याचा फटका झायनिग या शहराला बसला असून या महापुरात सुमारे 94 जणांचा मृत्यू किंवा वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पुराच्या तडाख्याने हजारो लोक बेघर झाले आहेत.

    गेल्या तीन दिवसांत 300-३५० मिलिमीटर पावसाची तेथे नोंद झाली आहे. सर्व नद्या गच्च भरल्या असून धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. झायनिंग शहरात सर्वाधिक वित्त व जीवित हानी झाली आहे. वीज व दूरध्वनी सेवा खंडित झाली आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. परंतु, सतत पडत असलेल्या पावसाने मदतकार्यात अडचण निर्माण झाले आहेत.

Trending