आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये नव वर्षाच्या पूर्व संध्‍येला चेंगराचेंगरी, 36 जणांचा मृत्यू, तर 47 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये नवीन वर्षाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. त्यात ३६ नागरिकांना प्राण गमावावे लागले. घटनेत ४८ जखमी झाले. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुंड शहरात ही घटना घडली. त्यानंतर देशभरात नवीन वर्षाच्या उत्सवावर शोककळा पसरली. दरम्यान, शंभर डॉलरची नकली नोट लुटताना उडालेल्या गोंधळात ही घटना घडली, असे सांगण्यात आले.

शांघायच्या चेन्यी स्क्वेअरवर थर्टी फर्स्टला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुंड भागातील प्रसिद्ध रिव्हरफ्रंट भागात स्थानिक वेळेनुसार साडेअकराच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. जखमींमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. गर्दी अधिक झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. जखमींना शांघायच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी बचाव पथक पाठवले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्यात आले.सुमारे ३ लाख नागरिक सेलिब्रेशनसाठी नदीकाठी एकत्र आले होते. शंभर डॉलरची नोट समजून ती लूटण्यासाठी एकच गोंधळ उडाला. परंतु ती नोट नसून प्रत्यक्षात ते कुपन होते. दुसरीकडे घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.

सामाजिक सुरक्षेला प्राधान्य
चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान ली केकियांग यांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. मृत तसेच जखमींच्या नातेवाइकांना योग्य ती मदत पुरवली जाईल, असे आश्वासन ली यांनी दिले.

काउंटडाऊनसाठी पर्यटकांची गर्दी : शांघायमधील बुंडमध्ये दरवर्षी नवीन वर्षाचे मोठ्या पातळीवर स्वागत होते. त्यासाठी पर्यटकांसह लाखो नागरिक सहभागी होतात.

घटनेचे कारण कळेना
चेंगराचेंगरी होऊन मृत होण्याच्या घटनेमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तपास अधिकारीही घटनेच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.

आम्ही ढकलले जात होतो
स्क्वेअर जवळून जात असताना आम्ही आपोआपच ढकलले जात होतो. तेथे नजरेत मावणार नाही एवढी गर्दी झालेली होती. गर्दीमुळे लोटालोटी सुरू झाली. त्यानंतर काही वेळ जागेवरून हलताही आले नाही. काही मुली आणि माझे मित्र त्यात कोसळले. अनेकांची डोकी फुटली. रात्रीच्या वेळची ही घटना अतिशय भयंकर होती. यू पिंग, प्रत्यक्षदर्शी
पुढे पाहा शांघायमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची छायाचित्रे....