आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Agree On Peaceful Solution To Border Dispute

सीमावादावर चीन नरम, भारताशी चर्चेस तयार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनने सीमावादावर भारतासोबत नरमाईची भूमिका घेताना चर्चेस तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. उभय देशातील सोळाव्या बैठकीदरम्यान शेजारी देशाने ही तयारी दर्शवली आहे. चीन-भारत सीमा वाद नव्या व्यासपीठावर सोडवण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील सहकार्य व सामरिक भागीदारीच्या नव्या पर्वाला आरंभ करण्याची नवी भूमिका आम्ही मांडत असल्याचे चीनचे विशेष प्रतिनिधी यांग जिएची यांनी म्हटले आहे. यांग हे माजी परराष्ट्र मंत्री आहेत. यांग व भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्यासोबत शुक्रवारी ही चर्चा झाली.