Home | International | China | china, air craft, 1st july, international

ड्रॅगनचे नवे विमानवाहू युद्धपोत

वृत्तसंस्था | Update - Jun 23, 2011, 02:51 AM IST

-चीन आपल्या पहिल्या विमानवाहू जहाजाची सागरी चाचणी १ जुलै रोजी करणार आहे.

 • china, air craft, 1st july, international

  हाँगकाँग -चीन आपल्या पहिल्या विमानवाहू जहाजाची सागरी चाचणी १ जुलै रोजी करणार आहे. सोव्हियत संघाच्या काळातील जहाजामध्ये नवे तंत्रज्ञान वापरून हे जहाज विकसित केले आहे. समुद्राच्या दक्षिण सीमेवरील वाढत्या तणावामुळे चीन चहाज बांधणीच्या अंतिम टप्प्यात आहे.
  विमानवाहू जहाजाचे आॅक्टोबर २०१२ पर्यंत जलावतरण होणार नाही, असे लष्करी अधिकाºयाच्या हवाल्याने हाँगकाँग कमर्शियल डेलीच्या वृत्तात म्हटले आहे. १ जुलैला कम्युनिस्ट पार्टीला ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या दिनाचे औचित्य साधून विमानवाहू जहाजाची चाचणी घेतली जाणार आहे.

  कोणापाशी किती विमानवाहू जहाजे ?
  > अमेरिका - ६७ > संयुक्त राष्ट - ४० > जपान - २०
  > फ्रान्स - ८ > रशिया - ५ > आस्ट्रेलिया - ३ > कॅनडा - ३
  > इटली - २ > भारत - २ > स्पेन - २ > ब्राझील - २
  > अर्जेंटना - २ > थायलंड - १ > नेदरलँड - १
  कसे असणार जहाज ?
  ९९० फूट लांब आणि १२५ फूट रुंद
  ५९ कि.मी. प्रतितासाचा वेग
  ८ बॉयलर, ४ शॉफ्ट आणि २ लाख हॉर्सपॉवरचे टर्बाइन
  ३८५७ खोल्या, १९६० सदस्यांचा चालक दल
  ६२६ सदस्यांचा एअर स्टाफ, ४० सदस्यांचा फ्लॅग स्टाफ
  २९ फिक्सड विंग विमान आणि २४ हेलिकॉप्टरचे भार पेलण्यास सक्षम
  ३ क्षेपणास्त्र प्रतिसेकंद सोडण्याची क्षमता, १९२ क्षेपणास्त्रे नेऊ शकेल.

Trending