आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी विमानांची जपानी हवाई क्षेत्रात घुसखोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- जपानच्या पूर्वेकडील समुद्रावरील हवाई क्षेत्रात पुन्हा एकदा चीनने घुसखोरी केली आहे. गेल्या महिनाभरातच ही दुसरी घटना असल्यामुळे जपानने चिनी राजदूतांना याबद्दल कठोर इशारा केला आहे. ही घटना निंदनीय असून यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, अशी सक्त ताकीद चीनी राजदूतांना देण्यात आली आहे. जपानच्या पूर्वेकडील समुद्रावरील सेंकाकू या जपानी बेटावर चीनचाही दावा आहे. दोन्ही देशांच्या हवाई सीमेवर दोन चिनी विमान जपानी विमानांच्या 30 मीटर अंतरावरून जात होते. मात्र चीनने हा आरोप फेटाळला असून यात जपानी विमानचालकांची चूक असल्याचे म्हटले आहे.