आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाला झुकवण्याची अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्कराचे निवृत्त कर्नल लियू मिंग फू अमेरिकेत कधी गेले नाहीत, पण चीन-अमेरिका संबंधाचे ते स्वयंघोषित विशेषज्ञ आहेत. त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिले - चीनचे स्वप्न - महाशक्तीचा दृष्टिकोन व अमेरिकी युगांतानंतर चीनची लष्करी स्थिती. लियू यांनी खरमरीत शब्दांत लिहिले की, चीनला एका लढवय्या नेत्याची गरज आहे. चीन धोक्यात आल्यावर त्याला आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी युद्ध पुकारणे आणि अमेरिकन लष्करी सार्मथ्य भेदण्यापलीकडे उपाय नसेल.

मार्चमध्ये शी जिनपिंग यांच्या हाती सत्ता आल्यावर लियू आनंदी आहेत. नोव्हेंबरमध्ये साम्यवादी पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आणि तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रपती झाल्यानंतर शी यांनी सीमावादाबाबत कडक भूमिका घेतली. चीन 2049 पर्यंत आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख लष्करी शक्ती बनेल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. शींनी इशारा दिला आहे की, पीपल्स लिबरेशन आर्मीने युद्धाला तयार राहावे. त्यांनी लियूंचे ‘चिनी स्वप्न’ स्वीकारले आहे. आपल्याला चीनच्या महान पुनरुज्जीवनाचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. समृद्ध देश व बलाढय़ लष्करादरम्यान एकजूट निश्चित करायला हवी, असा संकल्प ते करतात. चीनचा बहुतांश भागावर दावा असलेल्या दक्षिण चिनी समुद्राकडे जाणार्‍या विध्वंसक जहाजाचे निरीक्षण करताना डिसेंबरमध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.

चीनचे नवे अध्यक्ष पूर्वीच्या हू जिंताओंपेक्षा अधिक आक्रमक भाषणे करतात. हू शांततापूर्ण विकास, सामाजिक सलोख्यासारखे सुखद लक्ष्य ठेवून होते. मात्र, त्यांनी क्वचितच उदयोन्मुख महाशक्तीसारखा शब्द वापरला असेल. चीनसंबंधी मुद्दय़ांचे विशेषज्ञ डेव्हिड शामबाग म्हणतात, शींनी फारच खरमरीत भाषेचा वापर केला आहे.

मोठय़ा कालखंडापासून पाश्चात्त्य देशांबद्दल चीनचा दृष्टिकोन बदललेला नव्हता. गौरवशाली प्राचीन संस्कृतीला परदेशी आक्रमणकर्त्यांनी, ब्रिटिश अफू आणि युद्धकाळात जपानच्या दमनाने गुडघे टेकायला लावले होते, हे चीन जाणत होता. चीनच्या दृष्टीने काही दुर्दैवी शतके सोडल्यास जगावर त्याचा कायमच दबदबा राहिला. इकडे शी यांच्या आगमनाने आंतरराष्ट्रीय समुदायाशी चीनच्या संबंधांचे नवे पर्व सुरू झाले आहे. शी आणि त्यांच्या चिनी स्वप्नात एका बलवान राष्ट्राला जगात त्याची जागा पुन्हा मिळवण्याची तरतूद आहे.

चीनच्या पुनरोदयाची कथा आश्चर्यकारक आहे. पन्नास वर्षांपूर्वी अल्बानियासारखा एक लहान देश त्याच्या व्यापारी भागीदारांपैकी एक होता. आता तो जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पुढील पाच वर्षांत अमेरिकेला मागे टाकू शकतो. चिनी साम्यवादी पक्षाने तीस कोटी लोकांना बीपीएलमधून बाहेर काढले. चीन 2015 पर्यंत जगातील सर्वात मोठे कंझ्युमर मार्केट बनू शकतो. शस्त्रास्त्र विक्री करणार्‍या जगातील पाच प्रमुख देशांपैकी तो एक आहे.

चिनी विकास काही गैरसोयीचे वास्तव लपवू शकत नाही. विकसनशील देशांत रस्ते आणि रुग्णालयांवर अब्जावधी रुपये खर्च करूनही चीनची आंतरराष्ट्रीय प्रतिमा वाईट आहे. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने गेल्या महिन्यात जारी केलेल्या 21 देशांच्या एका सर्वेक्षणात चीनबाबत नकारात्मक मत देणार्‍यांची संख्या 39 टक्के आहे. लष्कराचा विस्तार, आग्नेय चिनी समुद्रावर चीनच्या दाव्याने शेजारी देश चिंतेत आहेत. प्रशांत महासागरावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अमेरिकेशी चढाओढ सुरू आहे, हाच मुद्दा नजरेसमोर ठेवून चीनची लष्करी तयारी सुरू आहे.

गेल्या तीन दशकांपासून चीनच्या आर्थिक विकासाचे दुष्परिणाम विषारी हवा, घाण पाणी, दूषित भूमी आणि वाढत्या अशांततेच्या रूपात पाहता येतात. दररोज होणारे पर्यावरण प्रदूषण, जमिनीवरील कब्जे, अधिकार्‍यांमधील भ्रष्टाचार आणि सरकारद्वारा होणार्‍या अल्पसंख्याकांच्या गळचेपीविरोधात निदर्शने होत असतात. र्शीमंत लोक मोठय़ा संख्येने देश सोडून जात आहेत. 2011 मध्ये दीड लाख चिनी नागरिकांनी कायमस्वरूपी परदेशी नागरिकत्व प्राप्त केले.

पूर्वी युद्ध तसेच दुष्काळापासून बचावण्यासाठी चिनी लोक कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कला जात. आता बहुतांश अनिवासी चिनी र्शीमंत आहेत. 2011 मध्ये 80 हजार चिनी नागरिकांनी अमेरिकन ग्रीनकार्ड मिळवले. भ्रष्ट चिनी अधिकारी विदेशात पळून जाणे सुरक्षित मानतात. ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी या अमेरिकी संस्थेनुसार चीनमधून 34221 अब्ज रुपये काळ्या पैशांच्या रूपात विदेशात गेले. सत्तेत असलेल्या स्थायी समितीच्या सर्व सातही सदस्यांचे कुटुंबीय विदेशात शिकली आहेत.

अंतर्गत वाढत्या अस्थिरतेत चिनी जनतेला अमेरिका, जपान, फिलिपाइन्ससारख्या शत्रूंविरोधात उभे करण्याचे शी यांचे धोरण आहे. तरीही बहुतांश नागरिक आपल्या नेत्याशी सहमत नाहीत. - सोबत गू योंगकियांग