Home | International | China | china at a time talking with pakistan and india

चीनने दाखवला रंग, भारतापेक्षा पाकिस्तान जवळचा

Agency | Update - Jun 23, 2011, 11:54 AM IST

पाकिस्तानमध्येही चीन आणि पाकिस्तान यांच्या सैनिक अधिका-यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवरून चीनच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित झाली आहे

 • china at a time talking with pakistan and india

  बीजिंग- भारतीय सैन्य दलाचे प्रतिनिधी मंडळ सध्या चीनच्या दौ-यावर आहे. त्याचवेळेस पाकिस्तानमध्येही चीन आणि पाकिस्तान यांच्या सैनिक अधिका-यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवरून चीनच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित झाली आहे. एकीकडे चीन भारताशी संरक्षण क्षेत्रात देवाण-घेवाण करण्याविषयी चर्चा करत आहे , तर त्याचदरम्यान ते पाकिस्तान बरोबरील संरक्षण क्षेत्रातील आपले संबंध वाढवण्याचाही प्रयत्न करीत आहे. यावरून चीन हा भारतापेक्षा पाकिस्तानला महत्व देतो का? असा प्रश्न निर्माण होतोय.

  गेल्या एक वर्षांपासूनभारताचे चीनशी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य थांबले होते. भारताने पुढाकार घेऊन याप्रकरणी उच्चस्तरीय चर्चा सुरू केली. याअंतर्गतच भारताने मेजर जनरल गुरमीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली रविवारी एक शिष्टमंडळ पाठवले आहे. या प्रतिनिधी मंडळात आठ सदस्यांचा समावेश आहे.
  याच दौ-यादरम्यान चीनने आपल्या सैन्य अधिका-यांचे शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवले आहे. या दोघांदरम्यान बुधवारी चकलाला येथील जॉईट स्टाफ हेडक्वाटर्स मध्ये बैठक झाली. मेजर जनरल झिया झिआओनिंग हे चीनच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करत आहेत तर लेप्टनंट जनरल मोहमद असिफ हे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहेत.

  सीमा वाद, अरूणाचल प्रदेश आणि काश्मीर वरून भारत आणि चीनमध्ये आधीपासून वाद आहे. यासाठी दोघांमध्ये युध्दही झाले. त्याशिवाय तिबेट वरून भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण असते. चीनने कायम पाकिस्तानला जवळ केले आहे. पाकिस्तान आणि चीनची हीच दोस्ती भारताला आतापर्यंत धोकादायक राहिली आहे.


  आपले मत
  चीन आणि पाकिस्तानच्या जवळीकीतेमुळे भारताचे काय नुकसान होऊ शकते? भारताने चीनवर विश्वास ठेवावा काय? आपले मत खालील तुमचे विचार या बॉक्समध्ये लिहून जगातील इतर वाचकांशी शेअर करा. आपत्तीजनक मतांसाठी वाचक स्वत: जबाबदार राहतील.Trending