बीजिंग - चीनने इस्लामिक वेशभूषा आणि लांब दाढी असणा-या नागरिकांना बसेसमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे. शिनझियांगमध्ये क्रीडा स्पर्धा सुरू होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात सांगण्यात आले आहे. याची अंमलबजावणी 11 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.
जो हा कायदा मोडेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यासाठी सैन्याला तयार करण्यात आले आहे. शिनझियांगच्या करामेमध्ये 13 वे शिनझियांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इस्लामिक वेशभूषा आणि दाढी असणा-या लोकांना स्पर्ध संपेपर्यंत हा कायदा पाळावा लागणार असल्याचे चीन सरकारने सांगितले आहे.