आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी रोखण्‍यासाठी चीनचा अजब फंडा, विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात ब्रा घालून येण्‍यास बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने कॉपी रोखण्‍यासाठी नवीच शक्‍कल लढविली. राष्‍ट्रीय प्रवेश परीक्षेत मुलींना मेटल क्लिप्‍स लावलेल्‍या ब्रा घालून येण्‍यास चीनने बंदी घातली. यामुळे वाद निर्माण झाला आहे. तर चीनच्‍या सरकारी माध्‍यमाने याचे समर्थन केले आहे. कॉपी रोखण्‍यासाठी उचलण्‍यात आलेल्‍या या पावलाबाबत अपप्रचार करण्‍यात येत आहे. चीनमध्‍ये शुक्रवार आणि शनिवारी 90 लाखांपेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्‍यानंतरच चीनमध्‍ये विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्‍ये प्रवेश मिळतो. या परीक्षेवर दरवर्षी माध्‍यमांची नजर राहते. कारण, कॉपी रोखण्‍यासाठी विद्यार्थी हरत-हेचे प्रयत्‍न करतात. नवी शक्‍कल लढवितात. तर सरकार त्‍यांना रोखण्‍यासाठी विचित्र नियम बनविते.

यावर्षी सरकारने मेटल क्लिप लावलेली ब्रा घालून परीक्षा केंद्रात येण्‍यास बंदी घातली. विद्यार्थिनींना मेटल डिटेक्‍टरमधून जावे लागले. मेटल डिटेक्‍टरने क्लिप ओळखल्‍यास विद्यार्थिनींना ब्रा काढण्‍यास सांगण्‍यात येत होते. सरकारी वृत्तपत्र ग्‍लोबल टाईम्‍सने विद्यार्थिनींना ब्राऐवजी अंडरशर्ट घालण्‍याचा सल्‍ला दिला होता.