बीजिंग - चीनमध्ये मुस्लिम लोकसंख्या असलेल्या शिनझियांग प्रांतात रमजान महिन्यात रोजा धरण्यास बंदी लादण्यात आली आहे. याबाबत शिनझियांग प्रांतातील शाळा आणि सरकारी कार्यालयांना आदेश देण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थी रोजा धरू शकत नाहीत आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागीही होऊ शकत नाहीत, असे या आदेशात म्हटले आहे. ही बंदी स्थानिक अल्पसंख्याक मुस्लिम उग्गीर यांच्यावर घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिनझियांग प्रांतात हिंसेच्या घटना घडल्यानंतर चीन सरकारने रोजा न ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पूर्वीही शिनझियांग सरकारने कर्मचा-यांना रमजान महिन्यात रोजा न ठेवण्याचा आदेश दिला होता. कारण याने त्यांची प्रकृती बिघडते. आम्ही सर्वांना सांगू इच्छितो, की रमजानच्या दरम्यान मुस्लिमांना रोजा ठेवण्याची परवानगी नाही. ही बंदी राजकीय पक्ष, शिक्षक आणि युवांवर राहिल, असे बोझाऊ रेडिओ आणि टीव्ही युनिव्हर्सिटीने वेबसाइटवर सांगितले आहे.
चीनी प्रशासन सध्या दिवसा मोफत जेवण देत आहे, असे चीनच्या बाहेर असलेल्या उग्गीर संघटनेने सांगितले आहे. परंतु, चीनचे सरकार आमच्या संस्कतीवर हल्ला करित आहे, असा आरोप स्थानिक उग्गीर मुस्लिमांनी केला आहे. दुसरीकडे सरकारी वृत्तपत्रातून रोजा धरणे शरीरास घातक आहे, असा प्रचार सुरू आहे.