Home | International | China | china, beijing

अतिमहत्त्वाकांक्षेमुळे चिनी लोकांवर परिणाम

वृत्तसंस्था | Update - Sep 01, 2011, 01:56 AM IST

जगाची आर्थिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चिनी लोकांच्या सरासरी कामजीवनावर गंभीर दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.

  • china, beijing

    बीजिंग: जगाची आर्थिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चिनी लोकांच्या सरासरी कामजीवनावर गंभीर दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. कामाच्या अतितणावामुळे हैराण झालेल्या चिनी माणसाचे कामजीवन नैराश्याने ग्रासत चालले आहे, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. ३४ टक्के लोक त्यांच्या लैंगिक जीवनात ‘असमाधानी’ आहेत, तर ६.५ टक्के लोक ‘खूपच असमाधानी’ आहेत. अन्य ३२ टक्के लोकांचे लैंगिक जीवन कसेबसे तग धरून आहे, असे चीन लोकसंख्या संप्रेषण केंद्र आणि शांघाय समाजविज्ञान अकादमीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. या सर्वेक्षणात १ ते ५५ वयोगटांतील ३,००० लोकांना प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी ७४ टक्के पुरुष होते. केवळ २३ टक्के लोक त्यांच्या लैंगिक जीवनात ‘समाधानी’, तर ३.६ टक्के लोक ‘खूप समाधानी’ असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

Trending